शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

Kolhapur: कुरुंदवाडमधील शेतकऱ्याचा सुडापोटी खून, नऊजणांना बेड्या; सांगली जिल्ह्यातील तिघांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:00 PM

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या आठ तासांत खुनाचा उलगडा

कुरुंदवाड : येथील शेतकरी सुनील भीमराव चव्हाण याच्या खूनप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या आठ तासांत मुख्य आरोपीसह एकूण दहा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. राहुल किरण भबिरे (रा. कुरुंदवाड ) हा मुख्य आरोपी असून विटा (जि. सांगली) येथील सहा, इचलकरंजी येथील एक आरोपी आहे. एक अल्पवयीन असून तिघेजण हद्दपारीतील आहेत.याप्रकरणी मुख्य आरोपी राहुल भबिरे, पवन नागेश कित्तुरे (रा. परीट गल्ली , कुरुंदवाड), सागर अरविंद पवार, अनिकेत दत्तात्रय ढवणे, तुषार तुकाराम भारंबल, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात, सोहन माणिक ठोकळे (सर्व रा. विटा, जि. सांगली), शहाजन अल्लाबक्ष पठाण (रा. इचलकरंजी) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी मृत चव्हाण व राहुल भबिरे यांचे भांडण झाले होते. यावेळी चव्हाण याने राहुलच्या मानेवर जबरी वार करून गंभीर जखमी केले होते. हाच राग मनात धरून त्याचा काटा काढण्याचे राहुलने ठरविले होते. त्यासाठी मित्रांना घेऊन सुनीलच्या पाळतीवर राहून सोमवारी सायंकाळी कोयत्याने पाठीवर, पायावर, हातावर वर्मी घाव घातल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता.खून झाल्याचे समजताच सहायक पोलिस निरीक्षक फडणीस व उपनिरीक्षक पवार यांनी शिवतीर्थावरील सीसीटीव्ही फुटेजवर आरोपींच्या संशयित हालचाली पाहून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक साळवी यांनी दिली.

आरोपी सराईत गुन्हेगारआरोपीतील सागर अरविंद पवार, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात हे सराईत गुन्हेगार असून सांगली जिल्ह्यातून हद्दपार आहेत.

आठ तासांत खुनाचा उलगडासुनील चव्हाण यांचा शेतात खून झाल्याने आरोपी शोधणे कठीण काम होते. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक फडणीस व उपनिरीक्षक पवार यांनी अवघ्या आठ तासांतच आरोपींना जेरबंद केल्याने उपअधीक्षक साळवी यांनी कुरुंदवाड पोलिसांचे कौतुक केले.

शहरात तणावाचे वातावरणमृत सुनीलचा मुलगा अनिकेत भारतीय सैन्यात आहे. तो मंगळवारी रात्री आल्याने सांगली सिव्हिलमध्ये शवगृहात ठेवण्यात आलेला सुनील यांचा मृतदेह शहरात आणण्यात आला. यावेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस