पन्हाळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील कोरोना रुग्ण आणि लसीकरणासंदर्भात सविस्तर माहिती पालकमंत्री सतेज पाटील व आमदार डॉ. विनय कोरे यांनी घेतली.
पन्हाळा तालुक्यात सध्या १५० बाधित रुग्ण आहेत. परंतु, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीनुसार अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर' भर देण्याबाबत सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. सोबतच तालुक्यामधील ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ६० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण केल्याचे उपविभागीय अधिकारी बी.आर माळी यांनी सांगीतले. उर्वरित नागरिकांचे सुद्धा लसीकरण लवकरात लवकर पूर्ण लवकरच होत असलेचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार संजय मंडलिक, आ. विनय कोरे, तहसीलदार रमेश शेंडगे, प्रांताधिकारी अमित माळी, तालुका आरोग्य अधिकारी अनिल कवठेकर आदी अधिकारी उपस्थित होते.