तालुक्यातील कोरोना काळजी केंद्राचे काम समाधानकारक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने उपाययोजना आखाव्यात, आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळाची कमतरता भासू नये, याची दक्षता घ्यावी, तालुक्यातील काही प्रमुख गावात लोकसहभाग, आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सहभागातून स्थानिक पातळीवर सर्व सोयींयुक्त अलगीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना करण्यात आल्या.
ग्रामीण रुग्णालयाला स्वतंत्र रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला जाईल, असे आमदार आबिटकर सांगितले. नायब तहसीलदार विजय जाधव, सागर धुंदरे आरोग्य विस्तार अधिकारी आर. एस. पाटील, डॉ. वैष्णवी कापसे, डॉ. दीपिका शेनॉय, डॉ. स्वाती चौगुले, डॉ. सरिता मोरे, डॉ. प्रदीप माळवदे, जयवंत कोरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
कोरोना स्थितीचा आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आबिटकर, तहसीलदार मीना निंबाळकर , गटविकास अधिकारी संदीप भंडारी.