प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सोशल मीडियाचावापर केवळ मनोरंजनासाठी न करता त्याचा उपयोग शैक्षणिक माहिती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढ व विकासासाठी व्हावा, यासाठी फुलेवाडी येथील महानगरपालिकेच्या महात्मा फुले विद्यालयातील शिक्षकांनी गतवर्षीपासून पुढाकार घेतला आहे. या शाळेतील शिक्षकांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांना शाळेतील नियमित अभ्यास, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीचा आढावा दिला जातो.मोबाईल क्रांतीमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ आले असून, माहिती आणि ज्ञानाची देवघेव वाढली आहे. सोशल मीडियावरील फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, हाईक, इन्स्टाग्राम अशा सोशल साईटस्च्या माध्यमातूनअनेक लोक थेट एकमेकांना जोडले जातात. प्रत्येकाच्या हातामध्ये अॅँड्रॉईड फोन आहे. त्यावरील सोशल मीडियाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांचा प्रगतीसाठी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी शाळेतील शिक्षक संतोष लक्ष्मण आंबेकर यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविला.प्रथम आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा ‘इयत्ता चौथी (अ) सेमी-इंग्रजी फुलेवाडी’ या नावाने व्हॉट्स अॅप ग्रुप सुरू केला. त्याद्वारे शाळेतील दररोजचा गृहपाठ, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, गैरहजेरी, परीक्षेचा कालावधी यांची माहिती देण्यास सुरुवात केली.यासह विविध उपक्रमांचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हिडीओ ग्रुपवर टाकू लागले. त्यामुळे काही अवघड पाठ्यक्रम किंवा संकल्पना सोप्या होऊ लागल्या. यासारखे अनेक फायदे समोर आल्याने शाळेतील अन्य शिक्षकांनी त्यांचे अनुकरण केले.विद्यार्थीकेंद्रित सुरू केलेली ही चळवळ शैक्षणिक गुणवत्तावाढ व विकास यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे.शिक्षक आणि पालकांमधील संपर्क वाढलाग्रुपद्वारे विविध शैक्षणिक व्हिडीओ पालक व विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचविले जातात.अभ्यासाविषयी विद्यार्थी व पालक यांच्या अडचणी सोडविण्यास मदत होते.वर्गातील विविध उपक्रम पालकांना पोहोचविण्यासाठी मदत होते.काही कारणांस्तव विद्यार्थी शाळेत येऊ शकला नाही तर त्याला होमवर्क मिळण्यास मदत होते.पालकांचा संपर्क राहण्यास मदत होते.विविध विषयांना अनुसरून संदर्भीय माहिती देण्यासाठी त्याचा उपयोग होतो.पालक व विद्यार्थी यांच्या चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होते.शिक्षक व विद्यार्थी यांची आंतरक्रिया घडून येण्यास मदत होते.पालकांना विविध सूचना देता येतात.
सोशल मीडियावरून मुलांच्या प्रगतीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:46 AM