कोल्हापूर : येथील शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या इमारतीत साहित्याची चोरी झाली होती, त्या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आकाश राम आडगूळ (वय २८, रा. दत्तमंदिराशेजारी, राजेंद्रनगर) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेंडा पार्कमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दि. ५ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने इमारतीच्या खिडकीतून प्रवेश करून आतील प्लायवूड मिनी कटर मशीन, दोन ड्रिल मशीन, हॅमर मशीन, एक राऊटर मशीन, टुल बॉक्स या साहित्यासह महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे २३ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत मोहनलाल चौधरी (रा. राजस्थान) या ठेकेदाराने राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान, त्या अनुषंगाने राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुप्तवार्ता विभागाने शोधमोहीम राबविली. मोतीनगर ते मोरेवाडी जाणाऱ्या मार्गावर राजेंद्रनगर बसथांब्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन खांद्यावरून पोते घेऊन जाताना दिसला. गस्तीवरील पोलिसांना पाहून तो पोते तेथेच टाकून पळून जाताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता दि. २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याकडून आणखी घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
फोटो नं. २६०५२०२१-कोल-आकाश आडगूळ (आरोपी)
===Photopath===
260521\26kol_10_26052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. २६०५२०२१-कोल-आकाश आडगुळ (आरोपी)