भादोले : चंद्रकांतदादा पाटील फौंडेशन व भाजप किसान मोर्चा यांच्या वतीने सुरू केलेले कोरोना सेंटर भादोले परिसरातील रुग्णांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
भादोले (ता. हातकणंगले) येथील कन्याशाळेमध्ये ३० बेडचे अलगीकरण केअर सेंटरचे उद्घाटन आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. अशोकराव माने म्हणाले, आम्ही भादोलेकर युवा शक्ती व किसान मोर्चा भादोले, हा चांगला उपक्रम राबवीत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार घेण्याची चांगली सोय उपलब्ध झाली आहे. त्यांचा लाभ घ्यावा.
याप्रसंगी स्वामी सेवानंद महाराज, जिल्हा परिषद सदस्य अशोक माने, संघटन मंत्री नाथाजी पाटील, सरपंच आनंदा कोळी, सरचिटणीस विठ्ठल पाटील, भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, ग्रामपंचायत सदस्य धोंडिराम पाटील, सूर्यकांत पाटील, विक्रम माने, शहाजी घोलप, वारणा बँक संचालक प्रकाश माने, पोलीस पाटील हर्षवर्धन माने, ग्रामसेवक शामसुंदर मुसळे, प्राथमिक आरोग्य अधिकारी माहेश्वरी कुंभार, सुरेश पाटील, संतोष पाटील, अर्जुन जामदार, अनिल माने उपस्थित होते. आभार नाना जाधव यांनी मानले.
फोटो कॅप्शन: भादोले (ता. हातकणंगले) येथे भाजप किसान मोर्चा चंद्रकांतदादा फौंडेशन व आम्ही भादोलेकर युवा शक्ती, भादोले यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड, अलीकरण सेंटरचे उद्घाटन आमदार सदाभाऊ खोत स्वामी सेवानंद महाराज अशोक माने, सरपंच आनंदा कोळी, प्रकाश माने, धोंडिराम पाटील यांच्या हस्ते झाले.