सिंधुदुर्गनगरी दि.23 : मुंबई ते गोवा या मार्गावर प्रवासी वाहतूक करणा-या खाजगी प्रवासी बसेस या प्रवाशांना सावंतवाडी शहरात न सोडता झाराप बायपास जवळ सोडतात, अशा स्वरुपाच्या तक्रारी आहेत. प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. सर्व खासगी प्रवासी बस मालकांनी प्रवाशांना झाराप बायपास येथे न सोडता सावंतवाडी शहरात सोडावे, असे न केल्यास बस चालक मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचाईशारा मुंबई-गोवा मार्गावरीलरिक्षा-बस चालकाना दण्यात आल्या आहेत. गणेश उत्सव काळात मोठ्या संख्येने प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. या काळात रेल्वे स्टेशन व बस स्थानकापासून आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर ॲटोरिक्षाचा वापर करतात या सर्व ॲटोरिक्षा परवाना धारकांनी प्रवाशांना उत्तम सेवा देणे अपेक्षित आहे तथापि अनेकदा जादा भाडे आकारणे, उध्दट वर्तवणुक करणे, भाडे नाकारणे अशा स्वरुपाच्या तक्रारी प्रवाशांकडून या कार्यालयाकडे केल्या जातात. यावर आळा घालण्यासाठी माहे ऑगस्ट 2017 मध्ये रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधी सोबत या कार्यालयाच्या अधिका-यांच्या व्दारे बैठका घेण्यात आलेल्या आहेत. बैठकीमध्ये रिक्षा चालकांनी गणवेश व बिल्ला परिधान करणे, प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारु नये, सर्व रिक्षा नंबर प्रमाणे लावणे, प्रवाशांना आणण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करुन नियमानुसार भाडे आकारुन सर्व प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करुन द्यावी,असे आवाहन सर्व ॲटोरिक्षा परवाना धारकाना केल्या आहेत. या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाल्यास ॲटोरिक्षा परवाना निलंबन, लायसन निलंबन, इत्यादी कारवाई सोबतच मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित चालकाकडून दंड वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात. |
मुंबई-गोवा मार्गावरील रिक्षा-बस चालकाना ईशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 7:10 PM