कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून संभाजीनगरातील इंदिरासागर सभागृहात रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. या नोंदणी अभियांनाची सुरुवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवानाधारकांना १५०० रुपयाचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे.ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संभाजीनगर येथील इंदिरासागर हॉल येथे तीन दिवसीय नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.यासाठी ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर.सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक सोबत घेऊन ही ऑनलाईन नोंदणी करावी. संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांना खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, असेही आ .पाटील यांनी सांगितले.यावेळी माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण,दुर्वास कदम,मधुकर रामाने,दिग्विजय मगदूम,दीपक थोरात,अभिजित देठे,पार्थ मुंडे,देवेंद्र सरनाईक,रोहित गाडीवडर,उदय पोवार,कुणाल पत्की,अक्षय शेळके,तानाजी लांडगे,पूजा आरडे आदी उपस्थित होते.
संभाजीनगरात रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 6:22 PM
corona virus Kolhapur : आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून संभाजीनगरातील इंदिरासागर सभागृहात रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. या नोंदणी अभियांनाची सुरुवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.
ठळक मुद्देसंभाजीनगरात रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा सुरु आमदार ऋतुराज पाटील यांचा पुढाकार