करवीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला, तसेच संशयित दोघा मित्रांना रात्रीच ताब्यात घेतले. दीपक रघुनाथ पोवार (३५, रा. शिवाजी उद्यमनगर), सागर दत्तात्रय चौगुले (३०, रा. प्लॉट नं. १०, बिल्डिंग नं. १, आयटीआय म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून माहिती अशी, योगेश शिंदेने दीपक व सागर या दोघा मित्रांना हातउसने २० व ३० हजार रुपये दिले होते. ते पैसे तो वारंवार परत मागत होता. या रागातून दीपक व सागर यांनी दुपारी १२ च्या सुमारास योगेशला घरातून बोलावून पार्टीच्या निमित्ताने त्याच्याच रिक्षातून वडणगे फाटा येथील मकरंद मेहंदळकर यांच्या मालकीच्या बंडगर मळ्यात नेले. तेथे तिघांनी भरपूर दारू पिली. त्यानंतर हातउसने दिलेल्या पैशांतून वाद उफाळला. त्यावेळी दोघा संशयितांनी योगेशच्या डोक्यात मोठे दगड घालून त्याला ठेचून जागीच ठार केले. रक्ताच्या थारोळ्यात झाडाखाली गवतात पडलेल्या मृतदेह सोडून ते दोघे पसार झाले.
करवीर पोलिसांना खबऱ्याकडून ही खुनाची माहिती मिळाल्याने पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यावेळी योगेशचा मृतदेह बनियन व पँट घातलेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृतदेहाच्या शेजारी मोठे दोन दगड, दारूच्या बाटल्या, योगेशच्या चपला, त्याचा निळा टी शर्ट विखुरलेल्या होत्या. घटनास्थळी अंधार असल्याने पोलिसांनी मोठा सर्चलाईटद्वारे पंचनामा उरकला. घटनास्थळी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे, विवेकानंद राळेभात, उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांच्यासह फॉरेन्सिक लॅबचे पथक तपासणी करत होते.
नियोजनबद्ध काढला मित्राचा काटा
योगेश, दीपक व सागर हे तिघे पूर्वी सोमवार पेठेत राहत असल्याने एकमेकांचे मित्र होते. पैसे मागत असल्याच्या रागातून दीपक व सागर यांनी बंडगर मळ्यातील ठिकाण निवडले. रस्त्यापासून सुमारे २०० मीटर आत गर्द उसाच्या शेतात हे निर्जनस्थळ आहे. त्यांनी नियोजनबद्ध ठिकाण निवडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पत्नीला केला फोन
तिघे दारू पिताना योगेशने आपल्या पत्नीला फोन करून या दोघांसोबत असल्याचे मोबाईलवरून सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. योगेशच्या मागे पत्नी व आई असा परिवार आहे.
फोटो नं. ०६१२२०२०-कोल-योगेश शिंदे (खून, खून०१,०२)
फोटो नं. ०६१२२०२०-कोल-पोलीस०१,०३
ओळ : घटनाथळी शेतात अंधार असल्याने पोलीस जनरेटरद्वारे सर्चलाईट पाडून पंचनामा करत होते.
फोटो नं. ०६१२२०२०-कोल-पोलीस०२
ओळ : घटनास्थळी संशयित व मृताच्या झालेल्या पार्टीतील दारूच्या बाटल्या.
(तानाजी)