शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

रिक्षा व्यावसायिकांनो शिस्तीचे पालन करा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 1:34 PM

कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काही जणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसेंजर घेणे यांसारख्या अनेक गोष्टी रिक्षा व्यावसायिकांसाठी वादग्रस्त ठरत आहेत.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या बैठकीत सूचना

कोल्हापूर : येथील रिक्षाव्यावसायिकांना शिस्त लागावी. त्यांनी वाहन परवाना, परमीट असल्याखेरीज व्यवसाय करू नये. ग्राहकांची लुबाडणूक करू नये. पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांना दिल्या. शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेत बैठकीचे आयोजन केले होते. १२ संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांनीच सूचनांचा आदर करीत, रिक्षा व्यावसायिकांच्या भल्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काही जणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसेंजर घेणे यांसारख्या अनेक गोष्टी रिक्षा व्यावसायिकांसाठी वादग्रस्त ठरत आहेत. रात्रीच्या वेळी मनाला येईल ते भाडे आकारने, ग्राहकांशी वाद घालणे आणि मध्यरात्री रस्त्यात सोडणे अशा घटना घडल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

याबाबतचे नियोजन करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस विश्वास नांगरे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली.१ जानेवारीपासून युनिफॉर्म सक्तीचा

रिक्षा व्यावसायिकांनी एक जानेवारीपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. लायसन्स, बिल्ला सक्ती करण्यात आली आहे. कुठलेही भाडे नाकारायचे नाही, रस्त्यावर स्टॉपखेरीज कुठेही भाडे घ्यायचे नाही, पार्किंग व्यवस्थित करावे, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी असलेल्या भाड्याबद्दल फलक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रिक्षा व्यावसायिकांनी शिस्तीने राहण्याचे या बैठकीत मान्य केले. 

तत्काळ अंमलबजावणीबैठकीनंतर तत्काळ ठरलेल्या नियमानुसार कारवाईला सुरुवात झाली. रिक्षा व्यावसायिकांना शिस्त लागण्यासाठी शुक्रवारी दिवसभर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, उपनिरीक्षक शाम देवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रयत्नशील होते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षा व्यावसायिकांचे नियोजन केल्यामुळे आता त्यांच्यात शिस्त दिसून येत आहे. तसेच ग्राहकांनादेखील या बैठकीनंतर झालेल्या सुधारणांचा फायदा होत आहे. 

 

प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेने ठरवलेल्या नियमांंचे उल्लंघन केल्यास रिक्षा व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईमध्ये कुठल्याही नेत्याने तडजोडीसाठी प्रयत्न करू नयेत.वसंत बाबर : पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस