कोल्हापूर : करवीरनगरीला खऱ्या अर्थाने हिरवाईने नटविण्यासाठी प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांचीच आहे; त्यामुळे शहर चकाचक होऊन, हवेतील प्रदूषण कमी व्हावे, या उद्देशाने ‘लोकमत’ने ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ रविवारी (दि. २५) सकाळी ६.३० वाजता आयोजित केली आहे; त्यामुळे या सायकल राईडला साथ द्यायला यायला लागतंय.‘लोकमत’ नेहमीच करवीरकरांच्या हितार्थ विविध सामाजिक उपक्रम राबविते. आता ‘कचरामुक्त व ग्रीन कोल्हापूर’साठी ं‘लोकमत’ने साद घातली आहे. त्यानुसार ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ आयोजित केली आहे. ही राईड रविवारी (दि. २५) सकाळी ६.३० वाजता हॉटेल सयाजी (साज लॉन) येथून सुरू होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यांना ५० रुपये, तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आहे. त्यात सहभागी होणाºयांनी शहरातील चार केंद्रांपैकी एका ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तत्काळ आपला बीब नंबर आपण घेऊन जाऊ शकता. यासह राईडच्या दिवशी प्रत्येकाला नाष्टा, एनर्जी ड्रिंक व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. राईडच्या सुरुवातीला ‘झुंबा वर्कआऊट’ सेशनदेखील होणार आहे.या राईडचे प्रायोजक हॉटेल सयाजी, तर सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह आहे, तर यासाठी नॉर्थस्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ‘डीवायपी’ वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, रेडिओ मिर्ची, दोशी सायकल, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब, एक्स्पोलर कोल्हापूर व कोल्हापूर सायकलिंग क्लब यांचे सहकार्य लाभले आहे. या राईडमध्ये करवीरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.कोल्हापुरात पहिल्यांदाअशा प्रकारची ‘सायकल राईड’ विशेषत: मुंबई, पुणे, बंगलोर, आदी मेट्रोसिटीमध्ये आयोजित केल्या जातात; मात्र, ही परंपरा आता कोल्हापुरातही ‘लोकमत’ने प्रथमच ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ आयोजित करून, शहरवासीयांना आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद कोल्हापूरकर देत आहेत. सायकल राईडची नावनोंदणी करून लगेचच आपला बीब घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.आकर्षक बक्षिसे जिंकाराईडनिमित्त ‘बेस्ट स्लोगन’, ‘बेस्ट ड्रेसअप’, ‘बेस्ट सायकलिस्ट’ आणि जास्तीत जास्त सहभाग गु्रप नोंदणी स्पर्धाही घेण्यात येणार आहे. त्यातील विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व बक्षिसे मिळणार आहेत. राईडमध्ये सहभागी होण्यासाठी ‘लोकमत’ शहर कार्यालय, ‘डीवायपी सिटी’, राजारामपुरीतील दोशी सायकल अथवा (९६०४६४४४९४/७९७२३९२०२५) क्रमांकावर संपर्क साधून आपली नावनोंदणी करून आपला सहभाग निश्चित करा.
यायला लागतंय सायकल राईडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:53 AM