सरवडे :काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे दोनच महिन्यांपूर्वी अस्तरीकरण करण्यात आले होते. त्या अस्तरीकरण कामाला भगदाड पडल्याने निकृष्ट कामकाजाबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राधानगरी तालुक्यातील सरवडे हद्दीत किलोमीटर १७ मध्ये साखळी क्रमांक १८० दरम्यान उजव्या कालव्यात डोंगर भागाकडे भगदाड पडले. शुक्रवारी सायंकाळी काही शेतकऱ्यांनी या संबंधी माहिती दिल्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य आर.के. मोरे यांनी भगदाड पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचे असल्याचे मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आज या ठिकाणी भगदाड पडल्याने त्याची प्रचिती आली आहे. तसेच सध्या कालव्यात भात रोप लागण व्हावी या उद्देशाने कमी प्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे. डोंगर भागाकडे हे भगदाड असल्याने त्याचा शेतपिकांना धोका नाही, परंतु या ठिकाणी भराव्याच्या बाजूने भगदाड पडण्यासारखीच स्थिती झाली आहे. दरम्यान असे भगदाड उन्हाळ्यात कालव्यातून मोठा विसर्ग असताना पडले असते तर शेकडो एकर ऊस,भात व पीक जमिनीचे नुकसान होते.व दुरुस्तीसाठी कोटीत पुन्हा खर्च झाला होतो आणि या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याअभावी वाळली जातात. तरी संभाव्य धोका ओळखून उत्तम दर्जाचे अस्तरीकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
०२ सरवडे बोगदा
...... फोटो
सरवडे हद्दीत उजव्या कालव्याला भगदाड