कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, गेल्या २४ तासांत तब्बल ४५२ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, तसेच सर्वाधिक म्हणजे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. २१९ जण बरे होऊन घरी गेले असून, सध्या ३१५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नव्या आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १९२ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत, तर २३ रुग्ण हे नगरपालिका क्षेत्रातील आहेत. दिवसभरामध्ये १२४८ जणांची तपासणी करण्यात आली असून, २३७३ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ४९९ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे.
चौकट
१२ मृतांमध्ये ९ जण जिल्ह्यातील
१२ मृतांमध्ये ९ जण कोल्हापूर जिल्ह्यातील असून, बाकीचे तीन सांगली, सिंधुुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातील आहेत. भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील ६५ वर्षीय महिला, कोल्हापूरमधील शुक्रवार पेठेतील ७० वर्षीय पुरुष, यादवनगरमधील ५० वर्षीय महिला, आजरा तालुक्यातील महागोंड येथील ५९ वर्षीय महिला, शाहूवाडी तालुक्यातील पंदुरे येथील ५० वर्षीय महिला, कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील ५० वर्षीय पुरुष, गडहिंग्लज तालुक्यातील मनवाड येथील ६४ वर्षीय पुरुष, हलकर्णी येथील ६१ वर्षीय पुरुष, हरिपूर सांगली येथील संभाजी चौकातील ५७ वर्षीय महिला, कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील ८१ वर्षीय पुरुष, हुक्केरी तालुक्यातील ६८ वर्षीय महिला यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
चौकट
आजरा १७
भुदरगड १७
चंदगड ०५
गडहिंग्लज ०४
गगनबावडा ०१
हातकणंगले ५७
कागल १६
करवीर ५०
पन्हाळा २०
राधानगरी ०३
शाहूवाडी ०४
शिरोळ १२
नगरपालिका २३
कोल्हापूर महापालिका १९२
अन्य जिल्हे ३१
एकूण ४५२