शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

गुळाला ‘शुगर’चा धोका हायड्रोस पावडरचा अतिरेक : कर्नाटकातील साखर मिश्रणाचे लोण कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:01 AM

कोल्हापूर : गुळाचा रंग व गोडी वाढवून कोल्हापुरी गुळाला टक्कर देण्यासाठी कर्नाटकातील विशेषत: सीमाभागातील गुºहाळमालकांनी उसाच्या रसात साखर मिसळण्यास सुरुवात केली.

कोल्हापूर : गुळाचा रंग व गोडी वाढवून कोल्हापुरी गुळाला टक्कर देण्यासाठी कर्नाटकातील विशेषत: सीमाभागातील गुºहाळमालकांनी उसाच्या रसात साखर मिसळण्यास सुरुवात केली. त्याचे लोण आता कोल्हापुरात पसरले असून बहुतांशी गुºहाळघरांवर कमी-अधिक प्रमाणात साखर व हायड्रोस पावडरचा वापर सुरू झाल्याने मूळ कोल्हापुरी गुळाचे गुणधर्म कमी होत आहेत.

परिणामी, शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेली गुळाची बाजारपेठ काहीशी बदनाम झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यापासूनच उसाचे मुबलक पीक आहे. साखर कारखानदारी सुरू व्हायची होती, त्यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपºयांत गुºहाळघरे सुरू होती. गुळाचे उत्पादन व्हायचे पण त्याला बाजारपेठ नसल्याने राजर्षी शाहू महाराज यांनी गुळाची बाजारपेठ वसवली. मुळात येथील मातीतच कसदारपणा असल्याने कोल्हापुरी गुळाने सातासमुद्रापार भुरळ घातली.

रासायनिक खतांचा वापर अत्यल्प होता. शेणखत, गावतलावातील गाळाचा वापर करून त्यावर पिके घेतली जात असल्याने प्रत्येक पिकात एक वेगळाच कसदारपणा असायचा. त्यामुळे पिवळाधमक व कणीदार गुळाने गुजरातची बाजारपेठेवर आपली हुकूमत गाजवली. गेली अनेक वर्षे ‘कोल्हापुरी गूळ’ म्हटले की ग्राहकांच्या उड्या पडतात. त्यामुळे कोल्हापुरीचा ब्रॅँड आजही देश-विदेशातील मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे.

कोल्हापूरसह सातारा, सांगली व कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन घेतले जाते. कणीदार गुळामुळे मार्केटमध्ये कोल्हापुरी गुळाला मागणी अधिक राहिली. त्यामुळे येथील गुळाला गुजरातच्या बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी सांगली व कर्नाटकातील गूळ उत्पादकांनी साखरमिश्रित गूळ निर्मिती करण्यास सुरुवात केली. ४० टक्के उसाचा रस व ६० टक्के साखरमिश्रित केल्याने गुळाची गोडी वाढते. त्याचबरोबर हायड्रोस पावडरचे प्रमाणही वाढविल्याने पांढराशुभ्र गूळ तयार होतो.

या गुळापुढे साखरविरहित कोल्हापुरी गूळ फिका पडत आहे. त्यामुळेच येथील उत्पादकांनी साखर वापरण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. या भेसळीमुळे ‘शाहूं’नी वसवलेल्या बाजारपेठेची बदनामी सुरू झाली आहे. ही बदनामी थांबविण्यासाठी साखरविरहित गूळनिर्मिती करणे गरजेचे आहे.गोडी वाढली पण टिकाऊपणा गेलासाखरमिश्रित गुळाची गोडी वाढली, पण त्याचा टिकाऊपणा गेला. गुजरातमधील व्यापारी गुळाची खरेदी करून तो शीतगृहात ठेवतात; पण साखरमिश्रित गुळाला पाणी सुटत असल्याने व्यापाºयांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचा परिणाम दरावर झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. 

आम्ही शंभर टक्के उसाच्या रसापासून गूळ निर्मिती करतो, पण कर्नाटकसह सांगली जिल्ह्यातून साखरमिश्रित गूळ येत असल्याने आमच्या गुळाला मार बसत आहे. प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी दर कमी मिळत आहे. साखरमिश्रित गूळनिर्मिती सुरूच राहिली तर शाहूंची बाजारपेठ टिकणे कठीण होईल.- दादासाहेब पाटीलगूळ उत्पादक, निगवे दुमाला

गुळास प्रतिक्विंटल १२०० रुपये अनुदान द्यावेबाजार समिती: चंद्रकांतदादांकडे मागणीकोल्हापूर : गुळाचे दर घसरल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून राज्य सरकारने गुळास प्रतिक्विंटल १२०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोमवारी केली.सध्या गूळ उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आहे. बेभरवशाच्या दराने जिल्ह्यातील शेकडो गुºहाळघरे बंद झाली आहेत. या व्यवसायाला सावरण्यासाठी सरकारने आता पुढाकार घेण्याची गरज आहे. कांद्याचे दर घसरले त्यावेळी सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५० व १०० रुपये याप्रमाणे अनुदान दिले होते. त्याप्रमाणे गुळाला १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांच्याकडे केली.गुळास प्रतिक्विंटल १२०० रुपये अनुदान द्यावे माध्यमातून गूळ खरेदी केली होती. त्याच धर्तीवर यावेळीही सरकारने धोरण अवलंबावे. शालेय पोषण आहारात समावेश केल्यास मागणी वाढून दर चांगला मिळेल, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.समितीचे सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे, संचालक परशराम खुडे, विलास साठे, भगवान काटे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे, गुºहाळमालक शिवाजी पाटील, रंगराव वरपे, आदम मुजावर, श्रीकांत घाटगे, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते.गुळाच्या प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेऊन काही तरी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.