VidhanSabha Election 2024: कोल्हापूर दक्षिणवर 'ऋतु'राज की महाडिकांचा 'अमल'; थेट दुरंगी लढत 

By पोपट केशव पवार | Published: October 19, 2024 05:16 PM2024-10-19T17:16:36+5:302024-10-19T17:17:33+5:30

पोपट पवार  कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांची राजकीय रणभूमी असणाऱ्या ...

Rituraj Patil of Congress and Amal Mahadik of BJP are fighting in Kolhapur South Constituency | VidhanSabha Election 2024: कोल्हापूर दक्षिणवर 'ऋतु'राज की महाडिकांचा 'अमल'; थेट दुरंगी लढत 

VidhanSabha Election 2024: कोल्हापूर दक्षिणवर 'ऋतु'राज की महाडिकांचा 'अमल'; थेट दुरंगी लढत 

पोपट पवार 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांची राजकीय रणभूमी असणाऱ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात यावेळेसही काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील व भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्यातच थेट दुरंगी लढत होत आहे.  

शहरी व ग्रामीण असा तोंडवळा असलेल्या या मतदारसंघातील राजकीय ईर्षा सर्वश्रुत आहे. येथील निकालाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर पडतात. महाडिक व पाटील यांना  मानणाऱ्या मतदारांचे  येथे  ‘पॉकेट’ आहे. त्यामुळे पक्षापेक्षाही येथे गटाला महत्त्व दिले जाते.  येथील निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून राबविली जाणारी प्रचार यंत्रणा, मतदारसंघातील संवदेनशीलता,  खर्चाचे  ‘आकडे’ थक्क करणारे  आहेत. त्यामुळेच कोल्हापूर दक्षिणचे ‘रण’ लढणे भल्याभल्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे असे बोलले जाते.

गेल्या सहा महिन्यांपासूनच पोस्टरबाजी व सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपाने येथील वातावरण तापत आहे. कोट्यवधीची विकासकामे, पाच वर्षांतील मोठा लोकसंपर्क व ‘सतेज पॉवर’च्या जोरावर ऋतुराज यांना पुन्हा विजयाची खात्री आहे, तर दक्षिणमधील रखडलेली विकासकामे, समस्या, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे घटलेले मताधिक्य व महाडिक गटाच्या ताकतीवर अमल महाडिकच आमदार होतील असा दावा केला जात  आहे.

इतर इच्छुक 

कंदलगावचे वसंत पाटील, जवाहरनगरातील अरुण सोनवणे, उजळाईवाडीचे एस. राजू माने अशी इतरही इच्छुकांची नावे येथे समोर  येत आहेत. अद्याप त्यांचा पक्ष की अपक्ष हे जरी ठरले नसले तरी  दक्षिणचे रण लढणे सोपे नाही  याची कल्पना साऱ्यांनाच आहे.

मागील तीनही निवडणुकीत उलटफेर

  • २००९ साली सतेज पाटील यांनी 'हाय व्होल्टेज' लढतीत धनंजय महाडिक यांचा अवघ्या ५,७६७ मतांनी पराभव केला, तर २०१४ ला भाजपकडून धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक यांनी भेट सतेज पाटील यांना ८,५२८ मतांनी पराभवांचा धक्का दिला.
  • २०१९ ला सतेज पाटील यांनी आपले पुतणे ऋतुराज यांना मैदानात उतरवून तब्बल ४२ हजार ७०९ मतांना अमल यांना पराभूत करुन पराभवाचे उट्टे काढले. त्यामुळे आता चौथ्या लढतीत २-२ बरोबरी की ३-१ असे निर्विवाद वर्चस्व याची उत्सुकता आहे.


२०१९चा निकाल 

Web Title: Rituraj Patil of Congress and Amal Mahadik of BJP are fighting in Kolhapur South Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.