कुरुंदवाड : गेल्या चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात बरसणाऱ्या पावसामुळे व धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठची पोटमळी पाण्याखाली गेल्याने ओल्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राधानगरी, काळमावाडी धरणातील पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. महापुरामुळे ऊस पिकासह इतर पिके, चाऱ्याची पिके गेल्याने ओल्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. पूर ओसरल्याने नदीकाठी असलेले गवत कापणीस आल्याने ओला चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी मिटला होता. मात्र पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडल्याने पोट मळीत असलेले गवती कुरण पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे ओल्या चाऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.
फोटो - १३०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कुरुंदवाड-शिरढोण पुलावरील पंचगंगा नदीचे पात्र पसरले आहे.