मुरगूड : कागल येथील शाहू हायस्कूलच्या मैदानात डी.आर.माने महाविद्यालयाच्या संयोजनाखाली पार पडलेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय व्हॉलिबॉल स्पर्धेत सर्वच गटांत मुरगूडमधील मुरगूड विद्यालय, शिवराज विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी स्पर्धेवर दबदबा कायम ठेवला. १७ वर्षांखालील मुलींचा मुरगूड विद्यालयाचा संघ व शिवराज विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलांचा व १९ वर्षांखालील मुला-मुलींचे संघ अंजिक्य ठरले. या चारही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्षांखालील मुरगूड विद्यालयाच्या मुलींच्या अंतिम सामन्यात म्हाकवे हायस्कूलचा पराभव करीत अंजिक्यपद पटकावले. यामध्ये सुप्रिया पोतदार, तेजस्विनी मगदूम, आकांशा सूर्यवंशी, सुहासिनी रावण, राजनंदिनी गोधडे, स्वप्नाली तोडकर, अंजली सुतार, सायली शिंदे, दीपाली तापेकर यांनी चांगला खेळ केला. १७ वर्षांखालील शिवराज विद्यालयाच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात बाचणीच्या संघाला पराभूत करून अंजिक्यपद मिळविले. १९ वर्षांखालील शिवराज विद्यालयाच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात मुरगूड विद्यालयाचा पराभव करीत अंजिक्यपद पटकावले. शिवराजकडून नंदू चौगले, श्रावण कळांद्रे, गजानन गोधडे, तर मुरगूड विद्यालयाकडून सूरज डेळेकर, विवेक पाटील, गुरुदेव पुजारी यांनी नेत्रदीपक खेळ केला. १९ वर्षांखालील शिवराज विद्यालयाच्या मुलींच्या संघाने बाचणी व देवचंद महाविद्यालयाचा पराभव करीत अजिंक्यपद प्राप्त केले. या संघामध्ये वृषाली सिरसेकर, निशा मेंडके, पायल मेंडके यांनी चांगला खेळ केला.शिवराजच्या संघाला प्राचार्य महादेव कानकेकर, प्रा. रवींद्र शिंदे, दत्ता लोंखंडे, एकनाथ आरडे, तर मुरगूड विद्यालयाच्या संघाला शिवाजीराव सावंत, प्राचार्य पी. व्ही. शिंदे, जे. डी. पाटील, एस. आर. पाटील, एस. एस कळंत्रे, एम. एच. खराडे, सुनील बोरवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)कागल येथील शासकीय व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या मुरगूड विद्यालयाच्या संघातील खेळाडूंसोबत उपप्राचार्य जे. डी. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, पयर्वेक्षक एस. आर. पाटील, पी. बी. लोकरे, आय. सी. पाटील, एम. एच. खराडे , अनिल पाटील, आदी उपस्थित होते.
तालुका व्हॉलिबॉल स्पर्धेवर मुरगूडचा झेंडा
By admin | Published: August 25, 2016 12:16 AM