पन्हाळा पंचायत समिती सभागृहात आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वीपणे अमंलबजावणी करून ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचविण्याच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी पन्हाळा पंचायत समिती नूतन सभापती वैशाली पाटील, जि. प. सदस्य शिवाजीराव मोरे, माजी पन्हाळा पंचायत समिती सभापती विष्णुपंत दादर्णे, अनिल कंदुरकर, पृथ्वीराज सरनोबत, जोतिबा ग्रामपंचायत माजी उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, माजी ग्रा. पं. सदस्य अजित भिवदर्णे, ग्रा. पं. सदस्य संतोष शिंगे उपस्थित होते.
फोटो : १) जोतिबा डोंगरच्या माजी सरपंच डॉ. रिया सांगळे यांना यशवंत सरपंच पुरस्काराने सन्मानित करताना आम. विनय कोरे सोबत पन्हाळा पं. स. माजी सभापती विष्णुपंत दादर्णे. माजी उपसरपंच जगन्नाथ दादर्णे.