अणदूर ते धुंदवडे दरम्यान जाणारा रस्ता हा अत्यंत दुर्गम भागातून जातो. रस्त्याच्या एका बाजूने खोल दरी आहे. धुंदवडेकडे जाणारा हा रस्ता अणदूर धरणाच्या शेजारुनच जात आहे. धरणाच्या वरच्या बाजूलाच हा रस्ता खचण्याचा प्रकार झाला आहे. रस्ता दहा बारा फूट खोल खचला असून डांबरी रस्त्यावर मोठ्या भेगा फडल्या आहेत. हा रस्ता संपूर्णपणे जंगलातून जात असल्याने आणि मुसळधार पाऊस असल्याने लोकांच्या लवकर लक्षात आला नव्हता. जंगलातून जाणारा हा रस्ता अणदूरहून पुढील गावांना जाण्यासाठी एकमेव जवळचा मार्ग होता.
येथे जवळच अणदूर धरण असल्याने रस्ता खचण्याचा या धरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती ही येथील नागरिकांना वाटत असल्याने भीतीच्या छायेखाली येथील लोक वावरत आहेत
फोटो
अणदूर ते धुंदवडे दरम्यान १०० ते १५० फुट रस्ता खोल खचला आहे.