निगवे ते सोनतळी दरम्यान मागीलवर्षी हा रस्ता करण्यात आला. यावेळी एक मोरी बांधण्यात आली होती. मोरीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केल्यामुळे मोरी जवळून रस्त्याचा भरावा खचला आहे. त्यामुळे मोरी उघडी पडली असून अर्धा अधिक रस्ता खचला गेला आहे. या खचलेल्या रस्त्याला त्वरित डागडुजी करणे आवश्यक आहे अन्यथा संपूर्ण रस्ता खचून पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी सोनतळी परिसरातील पूरग्रस्तांची मोठी गैरसोय होणार आहे तसेच रात्रीच्या काळी येणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण होणार आहे. तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याची नोंद घेऊन खचलेल्या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो- करवीर तालुक्यातील सोनतळी निगवे दरम्यानच्या रस्त्याचा खचलेला भरावा