आढाववाडी ते धनगरवाडा ही गावे विकासापासून व मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. निवडणुकीत मतदानापुरतीच लोकशाही आणि सरकार नावाची व्यवस्था इकडे फिरते. रस्त्यावर उद्घाटनाचे बोर्ड लागतात. वीस-पंचवीस नारळ फोडले जातात. मात्र, रस्त्यावर डांबर कधी पडणार असा चिंतेचा प्रश्न येथील लोकांना उद्भवू लागला आहे. पावसाळ्यामध्ये या दोन वाड्यांचा संपर्क तुटतो. रस्त्याचे उद्घाटन काही नेतेमंडळींनी केले; मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे कामच झाले नसल्याने लोकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोट
नेतेमंडळींनी नारळ फोडून या रस्त्याचे उद्घाटन केले आहे; मात्र प्रत्यक्षात रस्ताच झाला नाही. विकासाचे फक्त आमिष दाखवून डिजिटल फलकबाजी करून मतांची झोळी भरली. त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी.
फुलाजी पाटील
सरपंच मानवाड