विक्रम पाटीलकरंजफेण, 4 : इंजोळे ते खडेखोळ दरम्यान असलेला रस्ता यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खचला असून अवजड वाहतूक व एस.टी.च्या घुंगूर गावापर्यंत जाणार्या नियमितच्या सतरा फेर्या रद्द करण्यात अाल्या अाहेत.
वाघबीळ फाटा ते घुंगूर हा एकवीस की.मी.असणारा रस्ता ठराविक भाग वगळता जोरदार पावसामुळे मोठ मोठ्या खड्यांच्या विळख्यात सापडला अाहे.या मार्गावर नामांकीत शाळा महाविद्यालये असल्यामुळे नियमित मोठी वर्दळ असते. त्याबरोबर हा रस्ता डोंगरी भागातून मार्गक्रमण करत जात असल्यामुळे खराब रस्तामुळे अपघात झाल्यास मोठी जीवीत हानी होऊ शकते.त्यामुळे या रस्ताविषयी लोकमतमधून वेळोवेळी अावाज उठवण्यात अाला होता.
लोकप्रतीनिधींनी व सार्वजनीक बांधकाम विभागाने नियमित गांधारी भूमिका घेणेच पसंद केल्यामुळे परिसरातील नागरीकांच्यामधून मोठा अपघात होऊन लोक मरण्याची वाट पहात अहात काय..? अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली जात अाहे. हा रस्ता सुदैवाने दिवसा खचला नाहीतर रात्रीच्या वेळी खचला असता तर मोठा अपघात घडला असता अशी समिश्र प्रतिक्रीया लोकांच्यामधून उमटत अाहे.
रस्ता खचल्यामुळे एस.टी.बस.इंजोळे गावापर्यंतच जात असून तेथून पुढे असलेल्या दळवेवाडी, पोवारवाडी, धनगरवाडा, शिंदेवाडी, बांदिवडे, घुंगूर, सावरेवाडी व इतर वाड्यावस्तावरून शहरात येऊन उच्चशिक्षण घेणारे जवळपास सत्तर विद्यार्थी असून नियमित ये—जा करणारे पंन्रास कामगार अाहेत.त्यामुळे विद्यार्थांची व कामगारांची तसेच डोंगरी भागातून रूग्नांना शहराकडे अाणण्यासाठी एस.टी.सेवा बंद असल्यामुळे मोठी कुचंबना झाली अाहे.तसेच विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान होत अाहे. त्यामुळे रस्ता त्वरित दुरूस्त करून लोकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी जोर धरत अाहे.
जोराच्या पावसामुळे रस्ता खचला असून खचलेल्या भागाचे व इतर डागडूजीचे काम त्वरीत सुरू करून ताबडतोब पूर्ण करणार अाहे.त्यामुळे दोन दिवसामध्ये रस्ता वाहतूकीस खुला करून देण्यात येईल. - एल. बी. हजारे उपअभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग, पन्हाळा