कोल्हापूर : शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क करण्याचे काम येत्या सोमवारपासून हाती घ्या, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनास दिले. दिवाळीपूर्वी शहरातील सर्व रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण करून शहर चकाचक करा, असेही त्यांनी दुसऱ्यांदा बजावले.पालकमंत्री पाटील यांनी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकासकामांचा शुक्रवारी अजिंक्यतारा येथे आढावा घेतला. महापौर निलोफर आजरेकर अध्यक्षस्थानी होतेज्या रस्त्यांच्या मुदतीचा कालावधी (गॅरंटी पिरीयड)मध्ये रस्त्यांवरील खड्डे मुजविण्यासाठी पॅचवर्कचे काम संबंधित ठेकेदारांकडून तत्काळ करून घेण्याची सूचनाही दिल्या. पावसाची उघडीप मिळताच महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातंर्गत रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील, असे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.ॲड. गोविंद पानसरे, अहिल्याबाई होळकर, महात्मा गांधी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी १ कोटी ३० लाखांचा निधी देण्याचा निर्णय यावेळी झाला. स्थानिक विकासनिधीतून पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रत्येकी २० लाख देण्याची घोषणा केली. उर्वरित ७० लाख निधी महापालिका देणार आहे.अहिल्याबाई होळकर स्मारकासाठी फुलेवाडी रिंगरोड येथे जागा निश्चित करण्यात आली. होळकर यांचे हे जिल्ह्यातील पहिले स्मारक आहे. दोन टप्प्यात कामे पूर्ण केला जाणार असून पहिल्या टप्यात स्मारकासाठी महापालिकेने १७ लाखांचा निधी मंजूर केला असून निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या स्मारकासाठी ४५ लाखांचा निधी मंजूर असून ३५ लाख रुपये दिले आहेत. या स्मारकाचे कामेही लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. आमदारांकडून देण्यात येणाऱ्या निधीतून २५ लाख रुपये पानसरे स्मारकासाठी वापरले जाणार आहेत. त्यामधून दर्जेदात असे शिल्प उभारले जाणार आहे.४८८ रोजंदारी कर्मचारी होणार कायममहापालिकेतील ४८८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत कर्मचारी संघटनेची मागणी असून याबाबत आवश्यक बाबी पूर्ण करून हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू, अशी ग्वाहीही पालकमंत्री पाटील दिली.
शहरातील रस्ते पॅचवर्कचे काम सोमवारपासून करा :पालकमंत्री पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 10:58 AM
MuncipaltyCarporation, satejpatil, gardianminister, pathhole, roadsefty, kolhapurnews कोल्हापूर शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क करण्याचे काम येत्या सोमवारपासून हाती घ्या, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनास दिले. दिवाळीपूर्वी शहरातील सर्व रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण करून शहर चकाचक करा, असेही त्यांनी दुसऱ्यांदा बजावले.
ठळक मुद्देशहरातील रस्ते पॅचवर्कचे काम सोमवारपासून करा :पालकमंत्री पाटील यांचे आदेश पुतळ्यासाठी सव्वा कोटींचा निधी