लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शासनाने मंजूर केलेल्या १०७ कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. टारे कॉर्नर ते शाहू कॉर्नर या रस्त्याचे काम २ टप्प्यांत सुरू असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्याची चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका सायली लायकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले.
निवेदनात टारे कॉर्नर ते शाहू कॉर्नर या रस्त्याचे काम अभियंत्यांच्या अनुपस्थितीत सुरू आहे. रस्ता कामाचे अंदाजपत्रक व प्रत्यक्षात झालेले काम तफावत असण्याची शक्यता आहे. रस्ता उकरून काम करणे गरजेचे असताना केवळ पॅचवर्क करून केले जात आहे. त्यामुळे कामाचा दर्जा तपासावा व कोर टेस्ट करून घ्यावी आणि त्याचा अहवाल आल्याखेरीज ठेकेदाराची बिले अदा करू नयेत, असे म्हटले आहे.
फोटो ओळी
०८०७२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीतील टारे कॉर्नर ते शाहू कॉर्नर रस्त्याची चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका सायली लायकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले.