पन्हाळा - लोकमत न्यूज नेटवर्क
पन्हाळा - बुधवारपेठ रस्ता अतिवृष्टीने खचल्याने त्याचे बांधकाम येत्या सोमवारपासून सुरू होणार असून, कच्च्या स्वरुपातील रस्ता आठ दिवसांत सुरू करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अमोल कोळी यांनी सांगितले.
मंगळवार, दि. २७ रोजी पुणे येथील भूगर्भ शास्त्रज्ञांचे पाहणी पथक रस्ता दुरुस्तीचा अहवाल देतील. त्याप्रमाणे कामाची आखणी होऊन सोमवार, दि. २ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. रस्ता ६० मीटर लांब व ४५ फूट खोल घसरला असून, त्या अनुषंगाने योग्य पद्धतीने पाणी निचरा करण्याच्या योग्य तंत्राने काम पूर्ण करून कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असे नियोजन असल्याचे अभियंता अमोल कोळी यांनी सांगितले.