दत्तवाड : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे कर्नाटक शासनाने महाराष्ट्राच्या सीमा सील केल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील दानवाड-एकसंबा व दत्तवाड-सदलगा हे आंतरराज्य रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
गुरुवारी दुपारी कर्नाटक शासनाने महाराष्ट्राची सीमा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने बंद केली आहे. शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड व एकसंबा यादरम्यान असणाऱ्या दुधगंगा नदीवरील पुलावर काटेरी झुडपे टाकून रस्ता बंद केला आहे. तर दत्तवाड-सदलगा या आंतरराज्य रस्त्यावर असणाऱ्या दुधंगगा पुलावरील मुरूम टाकून रस्ता बंद केला आहे. याबरोबरच दत्तवाड-एकसंबा व दत्तवाड-मलिकवाड यादरम्यान असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यावरील रस्ताही बंद करण्यात आला आहे. तर घोसरवाड-सदलगा येथील असणारा कोल्हापूर बंधारा रस्ता सील करण्यात आला आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक शासनाने हा निर्णय घेतला असून महाराष्ट्र सीमेवरील सर्व रस्ते पुढील सात दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
फोटो - २५०३२०२१-जेएवाय-०५, ०६ फोटो ओळी - ०५) दानवाड- एकसंबा रस्त्यावरील पुलावर काटेरी झुडूप टाकून कर्नाटक शासनाने रस्ता बंद केला आहे. ०६) दत्तवाड- सदलगा रस्ता वरील दुधंगगा नदीवरील पुलावर मुरूम टाकून रस्ता बंद केला आहे.