कोल्हापूर/कळे : कळे (ता. पन्हाळा) येथील मध्यवर्ती बाजारपेठेतील प्रियांका ज्वेलर्स सराफ पेढी फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यासह मोठी रोकड लंपास केल्याचे सोमवारी पहाटे उघडकीस आले. या दरोडा प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वीही या पेढीवर दरोड्याचा प्रयत्न झाला होता. कुत्री भुंकल्याने चोरटे पसार झाले होते.१ फेब्र्र्रुवारी २०१९ रोजी कुडित्रे (ता.करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या कळे (ता. पन्हाळा) शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकून रोख साडे आठ लाखांसह २४४ तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे ७४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला दहा महिने पूर्ण होतात तोपर्यंत सराफ पेढीवर दरोडा टाकला. बँकेपासून हाकेच्या अंतरावरचं ही सराफ पेढी आहे.कळे येथे मुख बाजारपेठेत रस्त्याला लागून अरुण पाटील (रा. कळंबा, ता. करवीर) यांची व्यापारी संकुलची तिन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर पाटील यांचे सराफी दूकान आहे. तळ मजल्यावर जितु पुरोहित यांचे कापड दूकान आहे. ते याच ठिकाणी राहतात.सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास उठून बाहेर आलेनंतर त्यांना पहिल्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यावरील प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी पाटील यांना फोन करुन माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येवून पाहिले असता दूसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या रुमसह सहा दरवाजाचे शर्टरचे कुलूप तोडलेले दिसले. तेथून चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील सराफी दूकानात प्रवेश केला.
कपाटासह लॉकर व कौंन्टरमधील सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोकड लंपास करुन पसार झालेचे निदर्शनास आले. पाटील यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या कळे पोलीसांना वर्दी दिली.सहायक निरीक्षक श्रीकांत इंगवले टिमसह घटनास्थळी आले. ठसेतज्ज्ञांनी पाहणी करून श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते रस्त्यावरच घुटमळले. याच इमारतीमध्ये कोल्हापूर अर्बन बँकेची शाखा आहे. कळे-बाजारभोगाव मेन रोडवरील या सराफी दूकानात दरोडा पडल्याने नागरिकांत भीती पसरली.चोरटा सीसीटीव्हीतइमारतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक चोरटा हातामध्ये कटावणी घेवून जाताना दिसून आला. अंदाजे ३५ वर्षाचा असून अंगाने तगडा आहे. तोंडाला काळा मास्क बांधला आहे. अंगात काळे जॅकेट आहे. त्याचे हालचालीवरुन तो सराईत असल्याचे पोलीसांनी सांगितले.