शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

धामोड येथील युनियन बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 12:50 PM

धामोड (ता. राधानगरी) येथील युनियन बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. रोकड व सोन्याचे दागिने असलेले लॉकर तिजोरी फोडता न आल्याने त्यांचा कट फसला. २ कोटी ६८ लाखांचे सोन्याचे दागिने व १६ लाखाची रोकड असा सुमारे २ कोटी ८४ लाखांचा ऐवज बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्देधामोड येथील युनियन बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न पोलीस घटनास्थळी, परिसरात व्यावसायीकांसह नागरिकांत भिती

कोल्हापूर : धामोड (ता. राधानगरी) येथील युनियन बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. रोकड व सोन्याचे दागिने असलेले लॉकर तिजोरी फोडता न आल्याने त्यांचा कट फसला. २ कोटी ६८ लाखांचे सोन्याचे दागिने व १६ लाखाची रोकड असा सुमारे २ कोटी ८४ लाखांचा ऐवज बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.दरम्यान धामोड येथील बँकेवर दरोडा पडल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाली. कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याच्या चर्चेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक अनिल कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, करवीरचे सुनिल पाटील, राधानगरीचे उदय डुबल, सहायक निरीक्षक श्रीकांत इंगवले, सायबरचे मंगेश देसाई, श्वान पथकाचे डी. एस. पाटील, पी. एन. सुर्वे, पी. एस. निंबाळकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी शंभर फुट अंतरावर असलेल्या के. डी. बँक शाखेचे शर्टर उचकटण्याचा प्रयत्न केला. चोरीच्या प्रयत्नाने परिसरातील व्यावसायीकांच्यात भिती पसरली आहे.धामोड येथील मुख बाजारपेठ चौकात राजीव आळतेकर यांच्या दोन मजली इमारतीमध्ये तळमज्यावर युनियन बँकेची शाखा आहे. गेल्या वीस वर्षापासून ही बँक याठिकाणी आहे. परिसरात राष्ट्रीयकृत बँक एकमेव असल्याने व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता शटर उचकटून आतील दरवाजे तोडलेले दिसले.

आतमधील स्टाँगरुमचा दरवाजा तोडला मात्र रोकड व सोन्याचे दागिने असलेली लॉकर तिजोरी फोडता आली नाही. या दरोड्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली. बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

नेमकी रोकड आणि ऐवज किती चोरीला गेला आहे हे स्पष्ट झाले नव्हते. पोलीस घटनास्थळी पोहचलेनंतर रोकड व ऐवज सुरक्षीत असल्याचे येथील बँक व्यवस्थापक कुमोद भारद्वाज यांनी सांगितले. पोलीसांनी इन कॅमेरा लॉकर तिजोरी उघडली असता त्यामध्ये २ कोटी ६८ लाखांचे सोन्याचे दागिने व १६ लाखाची रोकड असा सुमारे २ कोटी ८४ लाखांचा ऐवज सुरक्षीत असल्याचे दिसले.

सर्वत्र सोशल मिडीयावरुन कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे वृत्त पसरले होते. पोलीसांनी तत्काळ बँकेतील रोकड व दागिने सुरक्षीत असलेचे मॅसेज व बँक व्यवस्थापक यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावरुन प्रसारित करुन जनजागृती केली. त्यानंतर आपल्या ठेवी आणि दागिने सुरक्षीत असल्याचे समजताच येथील खातेदारांचा जिव भांड्यात पडला.श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनी बँकेची पाहणी करुन काही नमुने घेतले. चोरट्यांनी बँकेच्या बाहेर असलेल्या सायरनची केबल तोडली होती. बँकेचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. या घटनास्थळावरुन शंभर फुट अंतरावर के. डी. सी. बँकेची शाखा आहे. त्याचेही शटर उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. चौघा जणांच्या टोळीने दरोड्याचा प्रयत्न केल्याचे बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. चोरट्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर