शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

काँगे्रस-राष्ट्रवादीत रुसवे-फुगवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:28 AM

संजय पारकर । लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : लोकसभा निवडणुकीसाठी एकाच दिवशी झालेला प्रा. संजय मंडलिकांचा तुरंबे येथील प्रचार ...

संजय पारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : लोकसभा निवडणुकीसाठी एकाच दिवशी झालेला प्रा. संजय मंडलिकांचा तुरंबे येथील प्रचार प्रारंभ व खासदार धनंजय महाडिक यांच्या राधानगरीतील काँगे्रसच्या मेळाव्याने राधानगरी तालुक्यात निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग भरू लागला आहे. विस्ताराने सर्वांत मोठा तालुका व प्रादेशिक असंलग्नता यामुळे थेट जनतेशी संपर्क साधणे उमेदवारांना केवळ अशक्य आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांवरच त्यांना अवलंबून राहावे लागते.उमेदवार निश्चित झाले असले तरी अनेक स्थानिक नेत्यांचे अजून ठरलेले नाही. विशेषत: काँगे्रस-राष्ट्रवादीतील रुसवे-फुगवे अजून दूर झालेले नाहीत. यामुळे गतवेळी मिळालेले २० हजारांचे मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान खासदार महाडिक यांच्यासमोर आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी व शिवसेना-भाजप युती यांच्यातच लढत होणार आहे. आजमितीला स्थानिक परिस्थिती पाहता वरवर तरी आघाडीची स्थिती मजबूत दिसते. मात्र, आघाडीतील अनेकांची मदत युतीला होणार आहे. गतवेळी अनेकांनी अंतर्गत अशी मदत केली होती. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या महाडिक विरोधातील उघड भूमिकेमुळे दूधगंगा काठावरील वजनदार नेते विजय मोरे, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, मारुतीराव जाधव यांच्यासह अनेकांनी मंडलिक यांच्या मागे ताकद लावली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा हा तालुका. ते जिल्ह्यात सक्रिय आहेत. उमेदवार त्यांच्या पक्षाचा आहे तरीही तालुक्यातील राष्ट्रवादीत अजून सामसूमच आहे. पक्षात एकमुखी वर्चस्व असलेल्या पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांचे जावई व ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यात दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सुप्त संघर्षाला पक्षाला दुफळीचे ग्रहण लागले आहे. याचा हा परिणाम असावा. तरीही आगामी विधानसभेची गणिते पाहून अपवाद वगळता संपूर्ण राष्ट्रवादी महाडिक यांच्या बाजूने राहील असे दिसते.मोठी ताकद असलेली व गटातटात विभागलेली काँग्रेस कधीच एकत्र येत नाही, अशी आजवरची स्थिती आहे. ही निवडणूकही त्याला अपवाद नाही. प्रामुख्याने काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. भोगावती कारखाना व जुना सांगरूळ विधानसभा मतदारसंघ यामुळे त्यांचा शब्द येथे प्रमाण आहे. ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदय पाटील व सर्व संचालक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, राजाराम साखरचे माजी संचालक सुधाकर साळोखे, एल. एस. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे यांच्यासह त्यांना मानणारे अनेकजण महाडिक यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत. महाडिक यांना मानणारे ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दत्तात्रय निल्ले, संचालक राजाराम मोरे, के. पी. चरापले व युवाशक्तीचे कार्यकर्ते प्रचारात असून, त्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांची भूमिका अजून जाहीर नाही. मात्र, त्यांची मदत मंडलिक यांना होण्याची शक्यता आहे. काही गावांतून ताकद टिकवून असलेल्या जनता दलाची भूमिकाही जाहीर नाही. त्यांचे नेते विठ्ठलराव खोराटे पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या मदतीने बिद्री कारखान्यात सत्तेत आहेत. त्यामुळे हा पक्ष याची परतफेड करणार की पुरोगामी म्हणून काँग्रेस आघाडीबरोबर राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मर्यादित अस्तित्व असलेला शेकाप आघाडीबरोबर राहील.मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना देशातील मोदी लाटेचा मोठा फायदा झाला होता. फार मोठी साथ नसतानाही ते फक्त वीस हजारांनी मागे राहिले. यावेळी मोदी लाट नाही. मात्र, त्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या संपर्क व कामांचा त्यांना फायदा होईल का, हा पाहावे लागेल. सतेज पाटील यांच्यामुळे मोठी कुमक जोडीला आहे. भाजपची ताकद मर्यादित आहे. युती होण्यापूर्वी आमदार आबिटकर यांना त्यांचा मोठा विरोध होता. मात्र, आता भाजपचे कार्यकर्तेही मंडलिक यांचा प्रचार करतात.खासदार धनंजय महाडिक यांना गेल्यावेळी येथे २० हजार मताधिक्य मिळाले होते. संपर्क राखण्यात ते कमी पडले, शिवाय लोकांची अपेक्षित कामेही झालेली नाहीत. याबरोबर महाडिक यांच्या जिल्ह्यातील राजकीय भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी अनेकांचे मनसुबे विधासभेचे आहेत. पुढील काळात होणारी ‘गोकुळ’ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही डावपेच आखले जात आहेत.