शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
2
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
3
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
4
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
5
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
6
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
7
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
8
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
9
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
10
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
11
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
12
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
13
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
14
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
15
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
16
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
17
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
18
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
19
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
20
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."

‘त्या’ दरोड्याचा छडा!

By admin | Published: September 19, 2015 11:47 PM

सहाजणांना अटक : सामूहिक अत्याचारातील दरोडेखोर शेजारचेच

सातारा : दहा दिवसांपूर्वी सातारा-कोरेगाव रस्त्यावर पडलेला दरोडा आणि अत्याचार प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या बोटांच्या ठशांवरून शेजारच्या हॉटेलातील आरोपींचा शोध लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. गणेश भीम अय्यर (वय २१, मूळ रा. कडल, ता. खिरसैन, जि. डोटी, नेपाळ, सध्या रा. त्रिपुटी खिंड, ता. सातारा), सुरेश बळिराम कांबळे (२८, रा. जांभखुर्द, ता. कोरेगाव), राहुल ऊर्फ संदीप ऊर्फ सन्डी शिवाजी कांबळे (३७, त्रिपुटी, ता. कोरेगाव), गणेश पिराजी घोडके (२४, रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव), नीलेश आत्माराम जाधव (२१, रा. तेताळनगर, जांब, ता. कोरेगाव), राजेंद्र लक्ष्मण माने (३५, रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सातारा-कोरेगाव रस्त्यावर दि. ११ रोजी एका शाळेच्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दाम्पत्याच्या झोपडीवर सहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. तसेच त्यावेळी तीन जणांनी सुरक्षारक्षकाच्या पत्नीवर अत्याचारही केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ दाखल झाले होते. त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दीपाली खटावकर या महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. दोन दरोडेखोरांच्या बोटांचे ठसे खटावकर यांना सापडले. त्यामुळे दरोडेखोरांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना हा महत्त्वाचा पुरावा सापडला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी एक ढाबा आहे. त्या ढाब्यावरील कर्मचारी आणि मालकाकडे पोलिसांनी या घटनेबाबत विचारपूस केली; परंतु त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. जिल्'ात अशा प्रकराची घृणास्पद घटना घडल्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांवर दबाव वाढत होता. पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी तीन पथके रवाना केली होती. मात्र, हा प्रकार स्थानिकांंकडून झाला असावा, अशी शंका पोलिसांना घटना घडली त्या दिवसांपासून होती. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पातळीवरच तपास केंद्रित केला होता. ढाब्यावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी) यात्रेत मौजमजेसाठी आखला बेत - गणेश अय्यर आणि राहुल कांबळे हे दोघे घटनास्थळासमोरील ढाब्यावर वेटर म्हणून काम करीत होते. राहुलच्या गावची जत्रा काही दिवसांवरच होती. त्यामुळे यात्रेमध्ये मौजमजा करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. समोर राहणाऱ्या दाम्पत्याला लुटल्यानंतर पैसे मिळतील, अशी त्यांना अपेक्षा होती; परंतु त्यांच्याजवळ फारसे पैसे सापडले नाहीत. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी सुरक्षारक्षकाच्या पत्नीवर अत्याचार केला असल्याचे तपासांत समोर आले. तिघांवर यापूर्वी गंभीर गुन्हे - अटक केलेल्या सुरेश कांबळे याच्या नावावर वाठार पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा, गणेश घोडके याच्याविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा, तर नीलेश जाधव याच्यावर मोटार चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासांत समोर आले आहे. गणेश अय्यर आणि राहुल कांबळे यांच्यावर कसलेही गुन्हे दाखल नाहीत; परंतु याच दोघांनी हा दरोड्याचा बेत आखला. - ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली असताना दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत या ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी तोंड उघडले नाही. दहानंतर मात्र, त्यांनी हळूहळू माहिती देण्यास सुरूवात केली. मात्र, ती माहितीही विसंगत होती, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. ढाब्यावरील दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. येथूनच या प्रकरणाचा उलगडा झाला. घटनास्थळी सापडलेले बोटांचे ठसे आणि ढाब्यावरील दोन कर्मचाऱ्यांच्या बोटांचे ठसे मिळते-जुळते झाल्याने पोलिसांचे पुढचे काम सोपे झाले. आरोपी सीसीटीव्हीत पीडित महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या तिसऱ्या दिवशी गणेश अय्यर रुग्णालयात आला. ज्या ठिकाणी पीडित महिला होती, त्या वॉर्डमध्ये जाऊन त्याने पीडित महिलेची तब्येत कशी आहे, हे लांबून पाहिले. त्यानंतर तो तेथून निघून गेला. हा सारा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ढाबेवाल्याचा थयथयाट फुसका! जे दोन कर्मचारी ढाब्यावर काम करत होते, तो ढाबा एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा आहे. अधिकाऱ्याचा मुलगा या ढाब्याचा व्यवहार पाहतो. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अधिकाऱ्याचा मुलगा व दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याचा राग निवृत्त अधिकाऱ्याला आला. आपल्या मुलावर आणि कर्मचाऱ्यांवर दांडगा विश्वास असल्यामुळे अधिकाऱ्याने थेट खाकीला आव्हान दिले. विनाकारण माझ्या मुलाला आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवले आहे. हे अन्यायकारक असून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा हा प्रकार असल्याचा संताप त्यांनी चक्क पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या निवेदनाकडे लक्ष न देता तपास सुरूच ठेवला. तपासात उघड झालं ते वेगळंच. पोलिसांनी सांगितलं, अधिकाऱ्याचा मुलगा त्या दिवशी रात्री ढाब्यावर नव्हता. तो वेगळ्या ‘उद्योगा’साठी बाहेर गेला होता. याचवेळी ढाब्यामधील कर्मचाऱ्यांनी बेत आखला. रात्री मी ढाब्यामध्ये नव्हतो, हे वडिलांना समजलं तर काय होईल, या भीतीने त्याने वडिलांना तर खोटं सांगितलंच शिवाय पोलिसांनाही खोटं सांगितले. अखेर हा सारा प्रकार त्या निवृत्त अधिकाऱ्यालाही समजला. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.