कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत पेठवडगांव (जि. कोल्हापूर) येथील रोहन रामराव पाटील याने देशात ४४ वा, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. वयाच्या २५ व्या वर्षी त्याने दुसऱ्या प्रयत्नात या परीक्षेत यश मिळवून बाजी मारली आहे.यावर्षी जानेवारीमध्ये आयईएसची पूर्वपरीक्षा, तर जुलैमध्ये मुख्य परीक्षा आणि सप्टेंबरमध्ये मुलाखत झाली. या परीक्षेचा अंतिम निकाल दि. ९ नोव्हेंबरला युपीएससीने आॅनलाईन जाहीर केला.
त्यामध्ये पेठवडगांवच्या रोहन याने देशात ४४ वा क्रमांक मिळविला. रोहनचे मूळ मौजे तासगाव (जि. कोल्हापूर) असून तो पेठवडगांव हायस्कूलचे पर्यवेक्षक रामराव आणि शिक्षिका रंजना यांचा मोठा मुलगा आहे.