शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

रोहित्र दुरुस्तीचे काम पूर्ण, आजपासून वीज सुरळीत

By admin | Published: April 30, 2017 1:14 AM

युद्धपातळीवर काम; महापारेषण, महावितरणचा समन्वय

कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या तळंदगे येथील ४०० के.व्ही. उपकेंद्रातील ५०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाबाचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाला बसला; पण महापारेषणने युद्धपातळीवर काम करून शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. नियोजबद्धरीत्या भारनियमनाचे प्रकरण हाताळल्याने ग्राहकांनाही फारसा त्रास झाला नाही. आज, रविवारी पहाटेनंतर या दुरुस्त केलेल्या रोहित्रावर हळूहळू भार वाढवून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० के.व्ही. अतिउच्चदाब उपकेंद्रातून जिल्ह्णाला वीजपुरवठा असून सध्या विजेची मागणी ११०० मेगावॅट आहे. त्यानुसार तळंदगे उपकेंद्रात ५०० एमव्हीए क्षमतेचा एक व ३१५ एमव्हीए क्षमतेचे दोन असे एकूण ११३० एमव्हीए क्षमतेची तीन अत्युच्च दाबाची रोहित्रे आहेत; पण बुधवारी (दि. ३६) ५०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रात अचानक बिघाड झाला. हे रोहित्र बदलण्याचे काम अवघड व जोखमीचे असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार होते.पण महापारेषणने महावितरणच्या मदतीने हे काम तीन दिवसांत शनिवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. त्याची रात्रीपासून पहाटेपर्यंत चाचणीही घेतली. घटनास्थळी महापारेषणचे संचालक (संचालन) ओमप्रकाश एम्पाल, मुख्य अभियंता सुरेशकुमार पाटील, अधीक्षक अभियंता एस. एस. कुंभार, कार्यकारी अभियंता ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता आर. एम. देव, ‘महावितरण’चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, थांबून कार्यरत होते. वीज देणे बंदहे रोहित्र दुरुस्ती होईपर्यंत जिल्ह्णातील विविध विभागांतील भारनियमन विभागून वीजपुरवठा करण्यात आला. विजेची मागणी मोठी असल्याने या कालावधीत गोवा, कर्नाटक राज्यांना देण्यात येणारी वीज बंद करून ती कोल्हापूरला वळवली होती.जिल्ह्णात विजेची मागणी असल्यामुळे परराज्यांत दिली जाणारी वीज जिल्ह्णात वळविली होती. त्यातून भारनियमन कमी करण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काम पूर्ण झाले असून आज, रविवार दुपारपासून या बदलेल्या रोहित्रामधून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येईल. - ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता, महापारेषण कंपनीशेतीसाठी भारनियमनगेले चार दिवस हे रोहित्र बदलण्याचे जोखमीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यासाठी जिल्ह्णातील शेती पंपांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता दोन तास भारनियमन केले. ती वेळ पुढे वाढवून दिली. तसेच काही प्रमाणात गावठाणातही भारनियमन करावे लागले होते. ही परिस्थिती अगोदरच जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहक सावध झाले होते. त्यामुळे त्याचा फटका बसला नाही.