शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

‘भोगावती शिक्षण’साठी चरापलेंची भूमिका महत्त्वाची

By admin | Published: July 27, 2016 12:16 AM

सतेज पाटील यांना साथ : साखर कारखान्यातील नोकरभरती, सभासदवाढीचा मुद्दा ऐरणीवर आणला

बाजीराव फराकटे -- शिरगाव भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक मागे-पुढे होण्यासाठी सत्तारूढ तसेच विरोधातील शिवसेना प्रयत्न करीत आहे. तरीही निवडणूक झालीच, तर या निवडणुकीत काँग्रेसचे नेते, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे. ते कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत. एकेकाळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांचे विश्वासू सहकारी असणारे चरापले हे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर होते. यातून पाटील व चरापले यांच्यातील दरी वाढत गेली. दूध संघाच्या उमेदवारीतही चरापले यांना सलग दुसऱ्यांदा डावलले गेल्याने त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उघड - उघड पी. एन., महादेवराव महाडिक पॅनेलला विरोध करून सतेज पाटील यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे, तर राधानगरी व भोगावती परिसरातील सर्व जबाबदारी चरापले यांच्या खांद्यावरच दिली होती. चरापले यांनीही विरोधी पॅनेलच्या विजयासाठी कष्ट घेतले होते. पण, यात सत्तारुढांनीच बाजी मारली.या दरम्यान ‘भोगावती’च्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भोगावती साखर कारखान्याची नोकरभरती, सभासद वाढीचा मुद्दा घेऊन चरापले यांनी कोर्टकचेऱ्या केल्या. काँग्रेसच्याही नेतेमंडळीनीसुद्धा कारखान्याची निवडणूक अथवा प्रशासक येण्यासाठी जिवाचे रान केले. सहा वर्षानंतर कारखान्यावर प्रशासक आले. ही लढाई चरापले यांच्यासह काँग्रेसच्या नेतेमंडळींनी जिंकली असली तरी खरी लढाई ही आता होणार आहे. कारण भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक लागली आहे. या मंडळावर एकेकाळी चरापले यांना आपले दुसरे नेते मानणारे प्रा. ए. डी. चौगले हे या संख्येचे चेअरमन झाले. सात-साडेसात वर्षांपूर्वी या संस्थेची निवडणूक झाली होती. यामध्ये न्यायालयीन लढाई लढली याचे बक्षीस म्हणून चौगले यांना चेअरमनपदाची लॉटरी लागली तर व्हा. चेअरमनपद राष्ट्रवादीच्या नामदेवराव पाटील यांना मिळाले.पण, आता महत्त्वाचा भाग आहे तो निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सत्तारुढ संचालकांनी आपले राजीनामे साखर कारखाना नियुक्त चेअरमन जयसिंगराव हुजरे यांच्याकडे दिले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संचालकांचा समावेश आहे. तर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना मानणाऱ्या तीन संचालकांनी काहीही करून निवडणूक लावण्याचे ठरविले आहे. यासाठी दोन्ही गट आज न्यायालयात आमने-सामने आले होते. यांची तारीख २८ जुलै पडली आहे. यावेळी जर निवडणूक लागलीच तर चरापले यांच्या भूमिकेला फार महत्त्व आहे. चरापले यांना सोबत घ्यावे का, अशी भूमिका माजी आमदार पी. एन. पाटील यांची असणार का हा महत्त्वाचा भाग आहे. जर राष्ट्रवादी-काँग्रेससह एकत्र पॅनेल झाले, तर मात्र गेली सहा वर्षे भोगावती साखर कारखान्याच्या कारभारावरून सत्तारूढ राष्ट्रवादी-शेकाप युतीला या ना त्या कारणाने जेरीस आणणारे नेते व स्थानिक कार्यकर्त्यांना ही युती रुचेल काय? हा प्रश्न आहे.चरापलेंच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसचे प्रयत्नभोगावती परिसरातील चरापले यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. ते पर्यायाने काँग्रेसचे असले तरीही चरापले यांचा शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व येणार आहे. काँग्रेसची नेतेमंडळी त्यांना आपल्याकडे ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. पण, भविष्यात काय होईल, हेही सांगता येत नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी चरापले हे या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरतील.