कोल्हापूर : संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी संपूर्ण समाजाबरोबर माध्यमांची भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन बालकल्याण समितीच्या सदस्या वकील दिलशाद मुजावर यांनी ‘महिला सुरक्षा’ विषयावरील कार्यशाळेत बोलताना केले.पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालय आणि प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित महिला सुरक्षा कार्यशाळेत शनिवारी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख होते.अॅड. मुजावर म्हणाल्या, विस्कळीत होत चाललेली कुटुंबसंस्था अधिक सक्षम आणि संस्कारक्षम बनविणे समाज हिताचे आहे. समाजस्वास्थ्यासाठी महिला आणि मुलींविषयी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, ‘महिला सुरक्षा व महिला सबलीकरणाबाबत असलेल्या विविध कायद्यांची माहिती प्रसार माध्यमांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. महिला विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास पोलीस यंत्रणा दक्ष आहे.अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी निर्भया पथकांची माहिती दिली. उपनिरीक्षक शीतल जाधव यांनी सायबर गुन्'ांपासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांनी कोणती दक्षता घ्यावी, याचे मार्गदर्शन केले.जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी प्रास्ताविक केले.