यवलूज ते काटेभोगावमार्गे कोकणात जाणा-या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. आठ दिवसात झालेल्या पावसामुळे व साइडपट्ट्या वरचेवर बुजवल्याने अनेक ठिकाणी वाहने रुतून अपघात झाले आहेत. केबलसाठी चार फुटांचा चर काढून वरचेवर माती टाकून बुजवला आहे. त्या ठेकेदाराने रोलिंग केलेले नाही. शेतकऱ्यांना शेतीपाण्यासाठी पाईप खोदाई करताना अपघात जबाबदारीची लेखी हमी घेतात. मात्र या केबलवाल्यांना कोण जाब विचारणार? असा सवाल विचारला जात आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालून रस्त्याच्या साइडपट्ट्या व्यवस्थित कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख जयराम पोवार, प्रशांत पोवार, अमर भोमकर, अजित पाटील, अशोक पाटील, सुरेश पोवार, सुरेश गोसावी, कृष्णात शिंदे, सागर पाटील, तुषार निवडेकर, सुभाष पोवार, बाजीराव नांगरे आदींनी दिला आहे.
फोटोः यवलूज ते काटेभोगाव दरम्यानच्या साइडपट्ट्या व्यवस्थित न बुजवल्यामुळे जागोजागी खचलेला रस्ता.