पेठवडगाव: येथील डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूटच्या रोनित रंजन नायक याने एन.डी.ए.च्या (लोकसेवा आयोग परीक्षा २०२० व १४५ वी तुकडी) परीक्षेमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर पंकेश मोठाभाऊ महाले (१२), गौरव मोहन नाथ (८९), चंदन पुंडलिक हरले (११५), पवन सोमेश्वर निर्मल (१७५) या विद्यार्थ्यांनीदेखील यादीत स्थान मिळविले आहे.
'पूनावाला स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट या विभागात प्रशासकीय अधिकारी तयार करण्यासाठी एन.डी.ए. व स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी केली जाते. ‘पूनावाला’स्कूलने विद्यार्थ्यांच्यासाठी दिलेल्या भौतिक सुविधा, विविध खेळांची परिपूर्ण मैदाने, सैन्यदलाप्रमाणे विद्यार्थ्यांची दिनचर्या, शिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, स्कूलच्या अध्यक्षा विद्या पोळ यांची मार्गदर्शन तर डॉ. सरदार जाधव, ए.एफ.पी.आय.चे चेअरमन विश्वास कदम, संचालक मेजर चंद्रसेन कुलथे, प्राचार्य मारुती कामत मार्गदर्शन लाभले.
०८ सायरस पुनावाला स्कूल