भुदरगड तालुक्यातील दुर्गम भागात आणि शेवटचे टोक असलेल्या मानी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. माझा वर्ग माझी ओळख या अभियानातंर्गत तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांचे रूप पालटले असताना या शाळेची इमारत मात्र जीर्ण होत चालली आहे. या शाळेच्या छताचे आतील रीप, दांडा, वाशे रूप काम तुटत चालल्याने आतील बाजूस ग्रामस्थांनी बांबूचे आधार दिले आहेत. या इमारतीचे छत केंव्हाही जमीनदोस्त होऊ शकते. तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने लक्ष घालून या शाळेची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी पालक आणि ग्रास्थांनी शालेय व्यवस्थापन समितीकडे केली आहे.
फोटो ओळ
मानी येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे तुटलेले छत