या वेळी मुल्हेरकर म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून समाजातील अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. कोरोना काळातही मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजनची मदत करण्यात आली आहे. शाळांना शौचालय, इमारत बांधून देण्याचे कामही रोटरीने केले आहे. या वेळी डॉ. शीतल देसाई, डॉ. संदीप सोनवणे, डॉ. आरती घोरपडे, डॉ. आशा रेगे, डॉ. शीतल एन. पाटील, डॉ. सुनीता रांगडे यांचा कोरोना काळातील सेवेबद्दल गौरव करण्यात आला.
सी. ए. दीपक पाटील, विकास परांजपे, विवेक भावसर, मयुरेश जोशी, जीएसटी अधिकारी शिरीष कुंदे, सुनील जाधव, अरविंद देशपांडे यांचा सत्कार झाला. रोहित परांजपे, एस. एस. पाटील, संजीव पारिख, प्रदीप गांधी, सुनील जाधव, राजू देशिंगकर, शरद पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : ०७ रोटरी शिरोली
ओळी :- रोटरी क्लब ऑफ शिरोली एमआयडीसीच्या पदग्रहण समारंभप्रसंगी माजी प्रांतपाल मोहन मुल्हेरकर, शेजारी नूतन अध्यक्ष विजय चौगुले, सचिव मिलिंद जगदाळे, एस. एस. पाटील उपस्थित होते.