कोल्हापूर -20 हजार फूटाच्या आसपास असणारे पांढरे ढग आपल्याला दिसत नाहीत, पण जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या ढगांमधून जातो त्यामुळे आपल्याला चंद्राच्या भोवती एक प्रकाश वलय दिसू लागते. त्याला वैज्ञानिक भाषेत लुनार किंवा मून हॅलो इफेक्ट म्हणतात (lunar halo effect) . कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी या घटनेचा मंगळवारी रात्री आनंद घेतला. हा नजारा खूप कमी वेळा बघावयास मिळतो. चंद्राला खळे पडल्याचे निदर्शनास येत असून त्यात दहाचा आकडा दिसत असल्याच्या गमतीदार चर्चा होत आहेत.
सूर्याभोवती पडणारे खळं हे फिजिक्स मधील ऑप्टीकसचा भाग आहे.सूर्या भोवतालचा खळं किवां रिंगण हा प्रिसम मधून किरणे गेल्यानंतर जसे सप्त रंग दिसतात तसाच हा प्रकार आहे. या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजी मध्ये हॅलो (halo) असे म्हणतात. तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात.
वादळ आल्यनंतर आकाशामध्ये जवळ जवळ 20 हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगांमध्ये लाखोंच्या संख्येने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्स मधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते. या मध्ये बर्फाचे असनारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात.
पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा १.३३ आहे.पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो. त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो.
जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या ढगांमधून जातो त्यामुळे आपल्याला चंद्राच्या भोवती एक प्रकाश वलय दिसू लागते. त्याला वैज्ञानिक भाषेत लुनार किंवा मून हॅलो इफेक्ट म्हणतात . हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवती देखील असे खळे दिसते. या मध्ये कुठीलीही अंधश्रद्धा बाळगू नये.प्रा . डॉ . मिलिंद मनोहर कारंजकर ,पदार्थ विज्ञान व खगोल शास्त्र विभाग प्रमुख विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर .