शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गोल केला अन् जाळे फाटले

By admin | Published: January 05, 2015 12:31 AM

यांनी घडविला कोल्हापूरचा फुटबॉल...

पाटाकडील तालीम मंडळाविरोधात ‘शिवाजी’चा सामना सुरू होता. सामन्यात ‘पाटाकडील’कडून बाळ निचिते गोलरक्षक होते. मी पेनल्टी क्षेत्रातून डाव्या बाजूने चढाई करत थेट गोल जाळ्यात जोरदार फटका मारत गोल केला. निचिते यांनी मुख्य पंचांना जाळे फाटल्याचे निदर्शनास आणून दिले, असे एक ना अनेक किस्से शिवाजी तरुण मंडळ व एस. टी. महामंडळाचे माजी फुटबॉलपटू शिवाजी इंगवले (बालग) सांगत होते.१ फेबु्रवारी १९७९ मध्ये पाटाकडील तालीम मंडळ विरोधात आमच्या शिवाजी तरुण मंडळाचा सामना शाहू स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात मी पेनल्टी क्षेत्रात अगदी जिवाच्या आकांताने गोलपोस्टच्या दिशेने जोरदार फटका लगावला. या फटक्यामुळे गोलबरोबर जाळेही फाटले. जाळे फाटल्याचे गोलरक्षक बाळ निचिते यांनी मुख्य पंच हंजाप्पा औरसंगे यांना कॉल करून दाखविले. दुसऱ्या दिवशी गांधी मैदान येथे प्रॅक्टिस क्लबशी गाठ पडली. हा सामना तीन दिवस चालला, पण कोणत्याही संघास गोल करता आला नाही. तिसऱ्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणात प्रॅक्टिसच्या चंचल देशपांडे यांनी हाताने गोल केला. २४ आॅगस्ट १९७९ रोजी मी न्यू कॉलेजचे प्रतिनिधित्व करत होतो. समोर लॉ कॉलेजकडून माजी मंत्री दिग्विजय खानविलकर गोलरक्षक म्हणून उभारले होते. या सामन्यात आमच्या संघाने लॉ कॉलेज संघावर ७-० अशी मात केली. त्यामध्ये मी तीन गोल करत हॅट्ट्रिक साधली होती. मी आक्रमक खेळत असल्याने माझे वडील कधीही माझा सामना पाहण्यास आले नाहीत. माझा खेळ पाहून स्वर्गीय शशिकांत नरके यांनी मला पंचवीस रुपयांचे बक्षीस दिले. त्यातील १४ रुपये २५ पैशांचा महाद्वार रोडवरील कामत रेस्टॉरंटमध्ये मंडळातील खेळाडूंना नाष्टा दिला.माझा खेळ पाहून मला अरुण नरके यांनी प्रथम शिवाजी तरुण मंडळाच्या वरिष्ठ संघात खेळण्याची संधी दिली, तर मला बूट कसे घालायचे याची शिकवण माझे बंधू जयसिंग इंगवले यांनी दिली. - शब्दांकन : सचिन भोसले