यड्राव/कोल्हापूर : येथील श्री ओंकारेश्वर मंदिर मध्ये महाशिवरात्री निमित्त संतत दुग्ध अभिषेक, शिवनाम जप,शिवलीलामृत पठण यासह विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.पहाटे दुग्धाभिषेक सुरुवात झाली सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या ओम नमः शिवाय जप शिवलीलामृत पठण भजन कीर्तन झाले होते. भाविकांना उन्हापासून संरक्षणासाठी दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या. आलेल्या भाविकांना उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. दिवसभर दिवसभर शिवलिंगावरसंत दुग्धाभिषेक शिवलिंगावर संतत दुग्धाभिषेकअभिषेक सुरू होते. अविनाश गाडगीळ, नितीन देवकाते व प्रशांत गोखले यांनी पौराहित्य केले.
लिंगावर अभिषेक सुरू होते मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते भाविकांना भाविकांना प्रसाद साहित्य व मुलांना मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य याठिकाणी उपलब्ध होते सायंकाळी मंदिर मंदिर प्रदक्षिणा पालखी मिरवणूक व महाआरती तसेच प्रदोष महाअभिषेक याने याने शिवरात्रिमहोत्सवाची सांगता होणार आहे. हे तीर्थक्षेत्र शिवलिंग, गणेश,पार्वती ,कासव आणि नंदी अशा पांच दैवतांच्या मूर्त्या असलेले एकमेव मंदिर आहे. पांच शिखरे असलेले हे जागृत मंदिर यड्राव ता. शिरोळ येथे आहे. जानेवारी 1983 मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराचा आराखडा हेमांडपंथी पध्दतीचा आहे.मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य शिखरावरील कळसाची उंची जमिनीपासून 59 फूट आहे.मंदीराची लांबी रुंदी 60 फूट बाय 60फूट आहे . मंदिरातील सर्व मूर्त्या मार्बलच्या आहेत शिवलिंग काळ्या मार्बल मध्ये 6 फूट 3 इंच लांबीचा आहे. गणेश व पार्वती च्या मूर्त्या पांढऱ्या मार्बल मध्ये 3 फूट उंचीच्या आहेत. नंदी काळ्या मार्बलमध्ये 5 फूट लांबीचा आहे. कासव 1 फूट लांबीचा आहे. प्रत्येक मूर्तीला स्वतंत्र शिखर आहे.अशी पांच शिखरे आहेत. मंदिर प्रवेशद्वारासमोर 12 फूट उंचीची घडीव काळ्या दगडाची दीपमाळ आहे. सर्व मूर्त्या जयपूर येथील राष्ट्रपती पदक विजेते जगदिशनारायण रामकुमार पांडे यांनी घडविल्या आहेत.
मंदिराचा उत्तर दरवाजा 13 फूट बाय 12 फूट आकाराचा असून त्यावर हुबळी (कर्नाटक) येथील कारागिरांनी सुंदर कोरीव काम केले आहे. सण 1948 साली बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या सोरटी सोमनाथ येथे शिवाची ज्या विधीने पुनः प्रतिष्ठापना करण्यात आली, त्याच विधीने येथील ओंकारेश्वर मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पुण्याचे प्रख्यात याज्ञीकाचार्य पंडित ग.गो.फाटक यांच्या पौराहित्या खाली संपन्न झाला.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तसेच महाशिवरात्री दिवशी मंदिरामध्ये शिवनाम जप, शिवसहस्र नाम, शिवलीलामृत पठण, तसेच पहाटे पासून दुग्धाभिषेक सुरू असतात.
कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी ली यड्राव -इचलकरंजी या संस्थेच्या माध्यमातून देशभक्त रत्नाप्पा कुंभार, मृगेंद्र आण्णा सुलतानपुरे व सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहकार्याने व व्यापारी बंधूंच्या मदतीने मंदिर उभारणी झाल्याने हे मंदिर म्हणजे एक श्रम देवतेचे मंदिर मानले गेले आहे.
सध्या राजेंद्र पाटील यड्रावकर हे मंदिराचे विश्वस्त आहेत तर मंदिराचे सर्व व्यवस्थापन भरत लड्डा हे पाहतात. भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी ओंकारेश्वर युवक मंडळ कुंभोज मळा मित्र मंडळ सेव्हन स्टार ग्रुप सेव्हन स्टार ग्रुप यांनी योग्य नियोजन केले होते यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.