कोल्हापूर : उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेच्या निषेर्धात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)तर्फे गुरुवारी दसरा चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी नराधमांना फाशी द्या, आरोपींना पाठीशा घालणाऱ्यांना बडतर्फ करा, आदी घोषणांनी परिसर दणाणला.हाथरस घटनेतील पिडीतेच्या कुटूंबांना न्याय मिळावा. खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशी द्यावी. सर्व घटनेची सीबीआय चौकशी करावी. प्रकरण पाठीशी घालणाऱ्या पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. दलितांवर होणारे अत्याचार त्वरीत थांबवावेत.
या सर्व बाबींचा तातडीने केंद्र सरकारने विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व सतीश माळगे यांनी केले.
यावेळी श्रीनिवास कांबळे, जानबा कांबळे, चरणदास कांबळे, किरण नामे, बाबासाहेब कांबळे कुंडलिक कांबळे, प्रविण निगवेकर, नितीन कांबळे, सलमान मौलाणी, भानुदास कांबळे, साताप्पा कांबळे, सचिन आडसुळे आदी उपस्थित होते.