कोल्हापूर : अल्प शिक्षण व अज्ञानाचा फायदा उठवत एका महिलेस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सुमारे २७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी संशयित किरण महिपती भुईंगडे व त्याची पत्नी माधुरी भुईंगडे (दोघेही रा. मनोहर कोतवाल नगर, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) या दाम्पत्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची तक्रार सुरेखा बाळू गंभीरे (रा. कोतवाल नगर, फुलेवाडी रिंगरोड) यांनी पोलीस ठाण्यात दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेखा गंभीरे व भुईंगडे दाम्पत्य यांचे कौटुंबिक संबंध आहेत. गंभीरे यांच्या अल्प शिक्षण व अल्प ज्ञानाचा फायदा उठवत पती बाळू गंभीरे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भुईंगडे दाम्पत्याने भाग पाडले. व त्यांना २७ लाखाचा गंडा घातला. गंभीरे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार किरण व माधुरी भुईंगडे या दाम्पत्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली २७ लाखाचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 6:22 PM