इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील अरुण सेवा सोसायटीमार्फत कोविडसाठी ७५ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक रघुनाथ पाटील यांनी जाहीर केले. यावेळी आरोग्य विभागाच्या आशा वर्कर्स व ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
सोसायटीच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, आशा वर्कर्स आपला जीव धोक्यात घालून काम केल्याने त्यांना सोसायटीच्या संचालकांनी प्रत्येकी एक हजार रुपये दिल्याचे सांगितले, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत फाउंडेशनकडून शिवराज पाटील यांनी दिली. यावेळी प्रकाश पाटील, माजी सरपंच विजय पाटील, माणिक पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.व्ही. कांबळे, तलाठी सीमा धुत्रे, प्रभाकर पाटील, रायगोंडा पाटील, अॅड. बाबासाहेब सूर्यवंशी, पिंटू जाधव, राहुल वाघमोडे, भगवान पुजारी, संजय घोरपडे, संजय पाटील आदी उपस्थित होते.