कोल्हापूर : खाजगी बसेस मधून होणाऱ्या मालवाहतुकीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकानी सोमवारी २१ बसेस वर कारवाई केली.खासगी बसेस मधून प्रवासी वाहतूकी बरोबरच मालवाहतूक केली जाते त्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्वांना दिले होते. त्या नुसार कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यात महाराष्ट्रातून जाणारी वाहने व मुंबई पुण्याकडून कोल्हापुरात येणारी वाहने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करतात.
भरारी पथकाने किणी टोल नाका, सीमा तपासणी नाका या ठिकाणी जोरदार कारवाई करून २१ वाहनांना प्रतिवेदन दिले आहे. खाजगी बसेस या प्रवासी वाहतुकीसाठी असून मालवाहतुकीसाठी त्याचा वापर करणे कायद्याच्या कक्षेत बसत नसल्यामुळे सर्व खाजगी वसेस मालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर तर्फे मालवाहतूक न करणे बाबत आवाहन करण्यात आले आहे.
ही तपासणी मोहीम अशीच सुरू ठेवली जाणार आहे. असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी स्पष्ट केले आहे.