कोल्हापूर : येथील महानगरपालिका आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने मंगळवारी कामगार, उद्योजकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शिबीर घेण्यात आले. त्यात ३२४ जणांची चाचणी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये उद्योग सुरू ठेवायचे असल्यास ४५ वर्षावरील उद्योजक, कामगारांनी लस घेणे. ४५ वर्षाच्या आतील लोकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे तपासणी शिबीर घेण्यात आले.
शिवाजी उद्यमनगरमधील इंजिनिअरींग असोसिएशनमधील या शिबीराचे उदघाटन शिल्पा दरेकर यांच्या हस्ते झाले. इंजिनिअरींग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी स्वागत केले.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, परवाना विभागाचे आर. एस. काटकर, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, डॉ. संजना बागडे, रविंद्र पोवार, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी, जयदिप मांगोरे, चंद्रकांत चोरगे, किरण चरणे, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे उपस्थित होते. उपाध्यक्ष हर्षद दलाल यांनी शिबीराचे संयोजन केले. दरम्यान, आज, बुधवारी वाय. पी. पोवारनगर औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेच्यावतीने मोफत आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे.