शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

मुले पळवण्याच्या संशयावरुन कोल्हापुरातील रुकडीत महिलेस मारहाण, पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 6:35 PM

याबाबतची अफवा पसरताच पालकांनी शाळेकडे धूम ठोकत पाल्यांना शाळेतून घरी नेले अन् गावात एकच गोंधळ उडाला.

अभय व्हनवाडेरुकडी-माणगाव : मागील काही दिवसापुर्वी मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या संशयितावरुन नागरिकांनी संशयितांना मारहाण केल्याच्याही घटना घडल्या होत्या. यातच आज पुन्हा हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे याच संशयावरुन एका महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.याबाबत माहिती अशी की, रुकडीत मुले पळवून नेणारी महिला आल्याच्या अफवेने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अशातच गावात एक फुगे विकणारी विद्रुप महिला आली होती. येथील शिवाजी चौकातील एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी गेली असता अंगावर चहा पडल्याने तेथेच कडेला कपडे बदलून परत गावात फुगे विकणेस जात असताना एका व्यक्तीने संशयावरून गावात मुले पळविणारी टोळी फिरत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली.त्यातच गावातील एक मुलगी शेजारी खेळत असताना ती उशीरा घरी परतली नाही. तीचा शोध घेत असताना संशयित महिलेने मुलीला उचलल्याच्या चर्चाने गावकरी महिलेवर चाल करून गेले. याबाबतची माहिती गावात पसरताच पालकांनी शाळेकडे धूम ठोकत पाल्यांना शाळेतून घरी नेले अन् गावात एकच गोंधळ उडाला. गोंधळताच हरवलेली मुलगी घरी परतल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.दरम्यान पोलीस पाटील कविता कांबळे यांनी याबाबत हातकणगंले पोलीस स्टेशनला कळवले.

हातकणगंले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेस ताब्यात घेवून चौकशी केली. यावेळी सदरची महिला फुगे अन्य वस्तू विकून उपजीविका चालवीत असल्याचे निदर्शनास आले. हातकणगंले पोलीस स्टेशनच्यावतीने अफवावर कोणी विश्वास  ठेवू नये व नागरिकांनी घाबरून जावून नये असे आवाहन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस