शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

रुकडीच्या बेपत्ता कारखानदाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : रुकडी (ता. हातकणंगले) येथील एका कारखानदाराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना तब्बल २६ दिवसांनी उघडकीस आली. हरिसिंग प्रीतमसिंग रामगडीया (वय ४९) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा खून त्यांच्या दोन परप्रांतीय कामगारांनी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह कुजला असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : रुकडी (ता. हातकणंगले) येथील एका कारखानदाराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना तब्बल २६ दिवसांनी उघडकीस आली. हरिसिंग प्रीतमसिंग रामगडीया (वय ४९) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा खून त्यांच्या दोन परप्रांतीय कामगारांनी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह कुजला असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवर हरिसिंग प्रीतमसिंग रामगडीया हे पत्नी सविता आणि सातवर्षीय हरज्योतसह राहत होते. ते मूळचे सोनीपत, दिल्ली येथील होत. बºयाच वर्षांपासून ते इचलकरंजी येथे राहत होते. त्यांचा ब्रेकलायनिंग तयार करणे आणि स्पेअरपार्टचा व्यवसाय इचलकरंजी आणि रुकडी येथील नदीरोडवरील गंजीमाळ परिसरात होता. रुकडी येथे त्यांनी सात वर्षांपूर्वी घर घेतले होते. त्यांच्याकडे काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशमधील आझमगड इथले भूपेंदर आणि हरविंदर हे कामगार काम करीत होते. ३० आॅगस्टपासून हरिसिंग बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी हातकणंगले पोलिसांत केली होती. हे दोन्हीही कामगार बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी शोध घेतला पण ते सापडून आले नाहीत. रविवारी सकाळी नातेवाईकांनी रुकडी इथल्या कारखान्याची स्वच्छता सुरू केली होती. यावेळी दुर्गंधी सुटल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शीतल खोत आणि पोलीसपाटील कविता कांबळे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तत्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सी. बी. भालके कर्मचाºयांसह दाखल झाले. कारखान्याच्या पाठीमागे असणाºया सिमेंट काँक्रीटच्या पाण्याच्या टाकीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मारेकºयांनी चाकू आणि कोयत्याच्या साह्याने डोक्यावर, मानेवर आणि हातावर वार करून खून केल्याच्या जखमा आहेत. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही कामगारांचा पगार हरिसिंग यांनी दिला नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता. त्यातूनच ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांनी भेट दिली. घटनास्थळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.