सचिन भोसलेकोल्हापूर : कोल्हापूर शहरात दिवसाला तीनशेहून अधिक जण वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यातील बहुतांश लोक वाहन परवाना नसताना वाहन चालवत असल्याचे दिसते.
गेल्या वर्षभरात शहर वाहतूक शाखेने नियम न पाळणाऱ्यांकडून १ लाख १२ हजार जणांना २ कोटी ३३ लाख दंडाची नोटीस बजावली. मात्र, त्यापैकी ४३ हजार जणांनी ९१ लाख रुपयांची तडजोड शुल्क भरले. उर्वरित ६९ हजार जणांकडून १ कोटी ४२ लाख दंड प्रलंबित आहे.गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेने मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविण्याचा परवाना नसलेले, रहदारीस अडथळा ठरणारी वाहने, दोनपेक्षा अधिक जण वाहनांवरून प्रवास करणे, विहित नमुन्यात वाहन क्रमांक प्लेट नसणे, फॅन्सी क्रमांक प्लेट, कर्कश हॉर्न, बेदरकार वाहन चालविणे, अठरा वर्षांखालील मुलांनी वाहन चालविणे, वाहनाचा विमा नसणे, विनाहेल्मेट वाहन चालविणे, अवजड वाहनातून प्रवासी वाहतूक करणे आदी नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाईचा बडगा उगारला.
त्यातून १ लाख १२ हजार ७११ जणांवर २ कोटी ३३ लाख १२ हजार ९०० रुपयांची दंडाची नोटीस बजावली, त्यापैकी ४३ हजार ६१८ जणांनी तडजोड शुल्कापोटी ९० लाख ९१ हजार ७०० रुपये भरले, तर उर्वरित ६९ हजार ९३ जणांकडून १ कोटी ४२ लाख १३ हजार २०० रुपयांचा दंड प्रलंबित राहिला आहे.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे, तर रस्ते अपुरे पडू लागले आहेत. याशिवाय प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई लागली आहे. त्यामुळे अनेकदा कळत नकळत वाहतूक नियमांचा भंग करीत आहेत. दिवसाकाठी तीनशे जण वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.वर्षभरातील आकडेवारी अशी,तपशील केसेस दंड
- वाहन चालविताना परवाना नसणे - २०,६०० ४१ २०,०००
- प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे १७,०९६ ३४,१९, २००
- वाहन चालविताना मोबाइलचा वापर ६,६३६ १३,२७ २००
- सिग्नल जंप करणे १,४०३ ०२,८० ६००
- वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे २,१९१ ४, ३८ २००
- विनाहेल्मेट ७४७ ०३,७३ ५००
- मद्यपान करून वाहन चालविणे ३८ २४ ८००
- इतर ६३,९९७ १,३३,२९ ४००