शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

kdcc bank election : सत्तारूढ गटाच्या पॅनेलची येत्या रविवारी घोषणा, आज होणार नावांवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 11:26 AM

शिवसेनेला नऊ जागांमध्ये जागा वाढवून देणे, अशक्य असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तर, आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीवर सूचक वक्तव्य केले.

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी सत्तारूढ गटाचे पॅनेलबाबत आज, शुक्रवारच्या बैठकीत चर्चा करुन नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल. मात्र अधिकृत घोषणा रविवारी केली जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आघाडीची मोट बांधताना सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यामुळे माघार घेण्याच्या सूचना केल्या आहेत.शिवसेनेने जरी चार जागांची मागणी केली असली तरी नऊ जागांमध्ये देणे अडचणीचे आहे. त्यांना समजावून सांगू. आज सायंकाळी सहा वाजता आम्ही सर्वजण बसणार आहे. त्यामध्ये पॅनेलला अंतिम स्वरुप दिले जाईल. माघारीसाठी दोन दिवस मिळावेत, म्हणून रविवारी पॅनेलची घोषणा करणार आहे.या वेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय संस्थांचे संचालक मंडळ २५ चे

जिल्हा व राज्यस्तरीय संस्थांचे कार्यक्षेत्र मोठे असते. राज्यात ३६ जिल्हे आहेत, आणि राज्य बँकेवर २१ संचालक कसे जाणार. यासाठी केंद्र सरकारच्या सहकार कायद्यात राज्याने अनेक बदल केेले आहेत. त्यानुसार आता जिल्हास्तरीय संस्थांचे संचालक मंडळ २५चे होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

शिवसेनेला दोनच जागा मिळणार

निवेदिता माने या आता शिवसेनेत गेल्या असल्या तरी गेली ३०-३५ वर्षे जिल्हा बँकेत आमच्यासोबत आहेत. संजय मंडलीकांबाबतही तसेच आहे. नऊ जागांमध्ये जागा वाढवून देणे, अशक्य असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

आवाडे यांच्या उमेदवारीला ‘पी. एन.-कोरें’ची मान्यता

आमदार प्रकाश आवाडे यांनी पतसंस्था गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय काेरे यांनी मान्यता दिली आहे. पॅनेल जाहीर होईल, त्यावेळी समजेल. असे सूचक वक्तव्य मंत्री मुश्रीफ यांनी केले.

मुलाखतीसाठी राष्ट्रवादीचे ४१ जण हजर

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ४१ इच्छुकांच्या मुलाखती मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतल्या. यावेळी बहुतांशी जणांना माघार घेण्याची सूचना केली. भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आसिफ फरास, आर. के. पोवार आदींनी मुलाखती दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफ